Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Savitribai Phule Pune University: पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात तरुणांचा राडा; चतुःशृंगी पोलिसांकडून नोटीस जारी

Pune University चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळ यांनी सांगितले की, दोन्ही विद्यार्थी याच विद्यापीठातील आहेत. रात्रीच्या वेळी मुलींच्या वसतिगृहात विनापरवानगी प्रवेश केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 13, 2026 | 04:33 PM
Pune University, SPPU, Girls Hostel, Chaturshringi Police, Pune Crime,

Pune University, SPPU, Girls Hostel, Chaturshringi Police, Pune Crime,

Follow Us
Follow Us:
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात दोन तरुणांचा विनापरवानगी प्रवेश
  • प्रमोद राठोड आणि ओंकार गोरे अशी गुन्हा दाखल झालेल्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांची नावे
  • रात्री साडेदहाच्या सुमारास लेट पास आणि पालकांच्या संमतीवरून विद्यार्थिनीसोबत झाला वाद
Savitribai Phule Pune University: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात रात्रीच्या वेळी विनापरवानगी प्रवेश केल्याप्रकरणी दोन विद्यार्थ्यांविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद राठोड आणि ओंकार गोरे अशी गुन्हा दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. दोघेही याच विद्यापीठात शिकत असून, पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास विद्यापीठ परिसरात एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी थांबून बोलत होते. हे दोघेही विद्यापीठातील विद्यार्थी आहेत. त्याचवेळी तेथे आलेल्या दोन विद्यार्थ्यांनी परिसरात काही वेळा फेऱ्या मारल्या. यावेळी विद्यार्थिनीने त्यांना तुम्ही येथे का फिरत आहात, अशी विचारणा केली. त्यावरून त्यांच्यात वाद झाला.

Solapur Crime News: २० एकर जमिनीवरून सांगोल्यात खळबळ; माजी आमदार आणि मुलावर गंभीर

यानंतर संबंधित विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनीला तिच्याकडे रात्री उशिरा बाहेर राहण्यासाठी परवानगीपत्र (लेट पास) आहे का, तसेच ती कुठली आहे आणि तिच्या वडिलांना ती बाहेर असल्याची माहिती आहे का, असे प्रश्न विचारले. याबाबत वसतिगृहाच्या रेक्टरकडे विचारणा करू, असे सांगत ते मुलींच्या वसतिगृहाच्या दिशेने गेले.

वसतिगृहात प्रवेश केल्याने गोंधळ

मुलींच्या वसतिगृहात पुरुषांना प्रवेशास मनाई असतानाही दोन्ही विद्यार्थी गेटच्या आत गेले. त्यांना वसतिगृह परिसरात पाहिल्यानंतर तेथे असलेल्या मुली खाली आल्या. या प्रकारामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वसतिगृहाचे गेट बंद केले. या घटनेनंतर प्रकरणाने गंभीर वळण घेतले.

भाजपचा पैसा फेक, तमाशा देख’चा अहंकार उतरवा; हर्षवर्धन सपकाळ यांचे शिक्षक-पदवीधरांना आवाहन

चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळ यांनी सांगितले की, दोन्ही विद्यार्थी याच विद्यापीठातील आहेत. रात्रीच्या वेळी मुलींच्या वसतिगृहात विनापरवानगी प्रवेश केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणी विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेतल्यानंतर तक्रार देण्यात आली. त्यानुसार १२ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२९(१) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही विद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या प्रकरणात दोन्ही विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

 

Web Title: Two students booked for unauthorized entry into pune university girls hostel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • Savitribai Phule Pune University

संबंधित बातम्या

Pune University News : पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या मेसममध्ये झुरळं, अळ्या आढळल्याचा आरोप; FDA कडून परवाना निलंबित
1

Pune University News : पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या मेसममध्ये झुरळं, अळ्या आढळल्याचा आरोप; FDA कडून परवाना निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.