Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मित्रानेच केला मित्राचा घात; धारदार शस्त्राने सपासप वार केले अन् नंतर…

सागरचे मित्र अक्षय कुकडे आणि इतर आरोपींनी त्यांच्यातील अज्ञात कारणावरून धारदार शस्त्राने वार करून जीवाने ठार मारण्याच्या उद्देशाने सागरवर वार केला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 03, 2025 | 07:54 AM
धारदार शस्त्राने तरुणाचा खून

धारदार शस्त्राने तरुणाचा खून

Follow Us
Follow Us:

देऊळगाव राजा : शहरातील जालना मार्गावरील ढाब्याजवळ एका 30 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. यातील आरोपींनी संगनमत करून तरुणाचा खून केल्याचे समोर आले आहे. सागर दिगंबर डुकरे (वय 30, रा. किन्ही ताठे, ता. जाफराबाद, जि. जालना) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून रविवारी (दि.1) सदर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मृत सागर डुकरे याचे बंधू गजानन दिगंबर डुकरे (वय 41, रा. किन्ही ताठे, ता. जाफराबाद, जिल्हा जालना) यांनी देऊळगाव राजा पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. त्यानुसार, 30 ते 31 मेच्या मध्यरात्री सागरचे मित्र अक्षय कुकडे आणि इतर आरोपींनी त्यांच्यातील अज्ञात कारणावरून धारदार शस्त्राने वार करून जीवाने ठार मारण्याच्या उद्देशाने सागरवर वार केला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या घटनेतील आरोपी अक्षय कुकडे आणि त्याच्या एका साथीदाराला देऊळगाव राजा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी चालू आहे. या घटनेमुळे देऊळगाव राजा तालुका तसेच मराठवाड्यातही खळबळ उडाली आहे.

दरम्यान, यामध्ये गँगवॉर असू शकते, असा कयासही लावला जात आहे. सदर घटनेची माहिती मिळताच बुलढाणाचे अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणीचे निर्देश दिले. याप्रकरणी अधिक तपास प्रभारी पोलिस निरीक्षक आशिष रोही करत आहे.

हडपसरमध्येही तरुणाची हत्या

दुसऱ्या एका घटनेत, कॅनोलच्या शेजारी बसून पार्टी करत असताना मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर दोन मित्रांनी एका मित्राला वाहत्या पाण्यात टाकून जीवे ठार मारल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या वर्षी (२०२४) घडलेल्या या घटनेत हडपसर पोलिसांनी आकस्मात मृत्यू प्रकरणाचा तपास करून खूनाचा प्रकार उघडकीस आणला आहे.

Web Title: Two youth murder their friend in deulgaon raja

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 07:54 AM

Topics:  

  • crime news
  • Murder News

संबंधित बातम्या

Crime News: पहाटे हॉटेलमधून बाहेर पडला… पण ती बाहेर आलीच नाही; बनावट नावाने मुक्काम, खोली उघडताच उडाला थरकाप
1

Crime News: पहाटे हॉटेलमधून बाहेर पडला… पण ती बाहेर आलीच नाही; बनावट नावाने मुक्काम, खोली उघडताच उडाला थरकाप

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
2

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
3

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
4

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.