Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai News: एपीएमसी पोलीस ठाण्याच्या बाप्पाचे पोलीस आयुक्तांकडून दर्शन; जनजागृती देखाव्याचे कौतुक

Navi Mumbai News: एपीएमसी पोलीस ठाण्यात विराजमान झालेल्या गणरायाचे पोलीस आयुक्तांनी दर्शन घेतले. यावेळी पोलीस ठाण्याच्या वतीने साकारण्यात आलेल्या जनजागृतीपर देखाव्याची त्यांनी पाहणी केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे पोलीस आयुक्तांनी कौतुक केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 22, 2026 | 04:10 PM
एपीएमसी पोलीस ठाण्याच्या बाप्पाचे पोलीस आयुक्तांकडून दर्शन; जनजागृती देखाव्याचे कौतुक

एपीएमसी पोलीस ठाण्याच्या बाप्पाचे पोलीस आयुक्तांकडून दर्शन; जनजागृती देखाव्याचे कौतुक

Follow Us
Follow Us:
  • पीएमसी पोलीस ठाण्यात गणरायाचे दर्शन
  • जनजागृतीपर देखाव्याने वेधले पोलीस आयुक्तांचे लक्ष
  • एपीएमसी पोलिसांच्या देखाव्याला आयुक्तांची दाद
नवी मुंबई : गणेशोत्सवाचे औचित्य साधून सामाजिक भान जपत एपीएमसी पोलीस ठाण्यात विराजमान झालेल्या श्री गणरायाचे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी उत्साहात दर्शन घेतले. यावेळी गणरायाची भावपूर्ण आरती करून त्यांनी उपस्थित सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी पोलीस उपआयुक्त विजय खरात आणि वाशी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त आदिनाथ बुधवंत यांची प्रमुख उपस्थिती होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर एपीएमसी पोलीस ठाण्याच्या वतीने साकारण्यात आलेल्या विशेष सामाजिक जनजागृतीपर देखाव्याची पाहणी केली.

Jamui Molestation Case: जमुई विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींचे एन्कांऊटंर; पोलिसांच्या चकमकीत नेमकं काय घडलं?

एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सुंदर व प्रबोधनात्मक देखावा साकारण्यात आला आहे. वाढते सायबर गुन्हे, नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी, अमली पदार्थांचे होणारे प्राणघातक दुष्परिणाम आणि सुरक्षित समाजाची निर्मिती या अत्यंत संवेदनशील विषयांवर या देखाव्यातून प्रभावी संदेश देण्यात आला आहे. धार्मिक उत्सवाच्या व्यासपीठाचा वापर करून समाजात सजगता निर्माण करण्याचा पोलिसांचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

सक्षम नेतृत्वाखालील जनहितार्थ मोहिमा

नवी मुंबईत आजवर अनेक पोलीस आयुक्त आले, परंतु मिलिंद भारंबे यांच्या कार्यकाळात अमली पदार्थांविरोधी मोहीम आणि सायबर गुन्हेगारीविरोधातील जनजागृतीला एक नवी दिशा मिळाली आहे. त्यांनी राबवलेल्या आक्रमक व प्रभावी मोहिमांमुळे नवी मुंबईतील गुन्हेगारीवर मोठा अंकुश बसला असून अनेक मोहिमा यशस्वीपणे पार पडल्या आहेत. म्हणूनच त्यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई पोलीस दल सामाजिक जनजागृतीच्या कार्यातही अग्रस्थानी दिसून येत आहे. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांमध्ये सायबर फसवणूक व व्यसनाधीनतेच्या धोक्यांबाबत सजगता निर्माण व्हावी, यासाठी एपीएमसी पोलीस ठाण्याने घेतलेला हा पुढाकार नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. या कार्यक्रमास एपीएमसी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Crime News: भडगावमध्ये ₹800च्या वादातून तरुणाची दगडाने हत्या; आरोपीच्या बॅगेत मृताचे दात आणि जिवंत कबुतरे आढळली

Web Title: Police commissioner visits apmc police station ganpati praises public awareness theme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • Ganeshotsav 2026
  • Navi Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Ratnagiri: परतीच्या प्रवासात ट्रॅफिकचे ‘विघ्न’; दुहेरी वाहतुकीमुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी
1

Ratnagiri: परतीच्या प्रवासात ट्रॅफिकचे ‘विघ्न’; दुहेरी वाहतुकीमुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Ganeshotsav 2026: साताऱ्याची प्रसिद्ध बावधन बगाड यात्रा थेट कोपरखैरण्यात; २० फूट प्रतिकृतीने वेधलं लक्ष
3

Ganeshotsav 2026: साताऱ्याची प्रसिद्ध बावधन बगाड यात्रा थेट कोपरखैरण्यात; २० फूट प्रतिकृतीने वेधलं लक्ष

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात ढोल-ताशा वाजविण्याची परंपरा कशी झाली सुरु? १९६५ च्या विरोधाशी काय आहे संबंध
4

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात ढोल-ताशा वाजविण्याची परंपरा कशी झाली सुरु? १९६५ च्या विरोधाशी काय आहे संबंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.