
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराजमध्ये (Prayagraj) दहावीचा विद्यार्थी अवैध शस्त्र घेऊन शाळेत पोहोचला. शाळेमध्ये विद्यार्थ्याला केलेल्या एका गोष्टीसाठी शिक्षकाची खूप बोलणी खावी लागली होती. वाद इतका विकोपाला गेला की दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. शिक्षकाने त्याचा सर्वांसमोर कोंबडाही (Punishment) केला होता.
विद्यार्थ्याने या गोष्टीचा इतका राग डोक्यात घालून घेतला की, दुसऱ्या दिवशी तो शाळेत आला तेव्हा त्याच्या बॅगेत तो देशी कट्टाच (illegal weapon) घेऊन पोहोचला. त्याचा सर्वांसमोर कोंबडा केल्यामुळे ही गोष्ट त्याला चांगलीच जिव्हारी लागली होती. आपल्या अपमानाचा वचपा काढण्यासाठी आणि शिक्षकाला धमकावण्याच्या हेतूने असं टोकाचं पाऊल उचललं. पोलीस या विद्यार्थ्याची चौकशी करत आहेत.
प्रयागराजच्या संगम शहरात एक विचित्र प्रकरण उघडकीस आले आहे, जिथे १० वीचा एक विद्यार्थी बेकायदेशीर शस्त्रांसह शाळेत पोहोचला पण शाळेत तपासणीदरम्यान पकडला गेला. शाळेतील शिक्षकाने मुलाला पोलिस ठाण्यात नेले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस आता या मुलाकडून अवैध शस्त्रास्त्राची माहिती गोळा करत आहेत. हे प्रकरण सोरांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.
वास्तविक, अब्दालपूर खास येथील एका शाळेत १५ वर्षांचा मुलगा १० वीत शिकतो. त्याने बॅगेत अवैध बंदूक ठेवली होती. शाळेत आल्यावर तपासणी केली असता त्यात एक देशी कट्टा असल्याचे निष्पन्न झाले. हे पाहून शाळेत एकच खळबळ उडाली. शिक्षकांनी मुलाला पकडून पोलिस ठाण्यात आणले. यानंतर पोलीस त्याची चौकशी करत आहेत.
[read_also content=”शरीरात दिसत असतील ‘ही’ लक्षणे तर समजून जा, ‘बिअर सोडनेका टाईम आ गया रे बाबा’ https://www.navarashtra.com/lifestyle/if-these-symptoms-are-visible-in-the-body-then-understand-you-should-stop-drinking-beer-nrvb-321193.html”]
पोलिस ठाण्याचे प्रभारी अशोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाकडून अवैध शस्त्रास्त्रांची माहिती गोळा केली जात आहे. त्याचवेळी, लोकांमध्ये अशी चर्चा आहे की, शिक्षकाने विद्यार्थ्याला शाळेत एका गोष्टीसाठी खूप शिवीगाळ केली होती आणि सर्वांसमोर कोंबडा देखील केला होता, यामुळे तो संतापला आणि दुसऱ्या दिवशी तो बॅगेत देशी कट्टा घेऊन आला.
पोलिसांच्या चौकशीत आरोपी मुलाने हे अवैध शस्त्र दुसऱ्या मुलाकडून विकत घेतल्याचेही निष्पन्न झाले. पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेतले आहे. दोन्ही आरोपी मुलांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी झारखंडमधील दुमका येथे एक विचित्र प्रकरण समोर आले होते. गोपीकांदर अनुसूचित जमाती निवासी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहाय्यक शिक्षक कुमार सुमन आणि लिपिक सोनेराम चडा यांना आंब्याच्या झाडाला बांधून मारहाण केली. काही वेळाने दोघांचीही सुटका करण्यात आली, त्यानंतर कुमार सुमन यांनी गोपीकांदर येथे जाऊन उपचार केले.
विद्यार्थ्यांनी मारहाणीचा व्हिडिओही बनवला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रॅक्टिकलमध्ये गुण देण्यात आले नाहीत, त्यामुळे ते नापास झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. यावर विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. विद्यार्थ्यांनी कुमार सुमन व लिपिक सोनेराम चोडे यांना शाळेच्या आवारातील आंब्याच्या झाडाला बांधून बेदम मारहाण केली.