
Satara Doctor Death Case: डॉक्टरांकडून हॅशटॅगवर 'ट्विटर वादळ'; आत्महत्या प्रकरणात केली मोठी मागणी
मुंबई: राज्यातील डॉक्टरांच्या संघटना एकवटून फलटण येथील महिला डॉक्टरच्या न्यायाची मागणी करत आहेत. रविवारी सायंकाळी ‘जस्टीस फॉर डॉ. संपदा‘ अशी ट्विटर चळवळ राबवली. सायंकाळी ५ नंतर समाजातील प्रत्येक घटकाने या चळवळीत सहभागी होऊन पीडित डॉक्टर साठी न्याय मागण्याचे आवाहन केले. हॅशटॅग चळवळ सुरु झाल्यावर काही वेळेत देशभरातून २७ हजार हॅशटॅग ट्विट झाले असल्याचे मार्ड अध्यक्ष डॉ. सचिन पाटील यांनी सांगितले, हे ट्विट मोहीम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी सांगितली.
दरम्यान हॅशटॅगच्या या ‘ट्विटर वादळात एसआयटी चौकशी आणि ५ कोटी रुपये मदतीची मागणी करण्यात आली आहे. एका डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी सेंट्रल मार्ड, चीएमसी मार्ड, यांनी एकत्रितपणे सोशल मीडियावर हे ट्विटर स्टॉर्म आयोजित केले आहे. आयएमए संघटनेने देखील या चळवळीत जोडण्याचे आवाहन केले आहे. रविवारी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये सहभागी होऊन देशाला या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्यास भाग पाडावे, असे आवाहन आयोजकांनी केले.
Satara Doctor Death Case: महिला डॉक्टर प्रकरणात PSI बदणेला मोठा धक्का; न्यायालयाचा मोठा निर्णय
‘जस्टीस फॉर डॉ. संपदा मुंडे’ सोशल मिडियावरून करण्यात आले आवाहन
#justicefordrsampada हा हॅशटॅग वापरून अधिकाधिक लोकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. डॉक्टर संघटनांनी प्रशासनाकडे खालीलप्रमाणे कठोर मागण्या केल्या आहेत., एसआयटीची तातडीने स्थापनाः या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्वरित स्थापन करावे.
डॉक्टरांच्या कायदेशीर संरक्षणासाठी आणि मानसिक आरोग्य सहाय्यासाठी विशेष पथक
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या आत्महत्येच्या प्रकरणानंतर राज्यातील वैद्यकीय समुदायात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दरम्यान, मध्यवर्ती मार्डने निवासी डॉक्टरांच्या कायदेशीर संरक्षणासाठी आणि मानसिक आरोग्य सहाय्यासाठी विशेष पथके स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून डॉक्टरांना न्याय, सन्मान आणि सुरक्षित कार्यपरिसर मिळावा, हा उद्देश असल्याचे मार्डचे अध्यक्ष डॉ. सचिन मुंडे पाटील यांनी सांगितले.
सोशल मीडियामध्ये कसे सहभागी व्हावे?
ब्जस्टीसफॉरडॉ संपदा फितीच्या निषेधाचे फोटो शेअर वापरून दिष्ट करा. काळ्या करा. प्रत्येक पोस्टला याच हॅशटॅगसह रीट्रिक्ट आणि कोट करा. इंस्टाग्रामवर पोस्ट करतानाही जस्टीसफॉरडॉसंपदा वापरा. अजस्टीसाफॉर डॉ संपदा आज ट्रेड झालाच पाहिजे असे सांगून जास्तीत जास्त सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे.
पाच कोटी रुपये आर्थिक मदत
डॉ. संपदा या कुटुंबातील प्रमुख कमावत्या व्यक्ती असल्याने त्यांच्या कुटुंबाला ५ कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी.वारंवार तक्रारी करूनही ज्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, अशा दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी विशेष मागणी
कामाच्या ठिकाणी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा म्हणजे (पीओएसएच) आणि प्रत्येक संस्थेत अंतर्गत समिती (आयसीसी) स्थापन करणे., महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रतिष्ठेसाठी सर्व सरकारी आरोग्य संस्थांमध्ये लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा अंतर्गत तक्रार समिती) ची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
66 फलटणसारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मध्यवर्ती मार्ड ठोस पावले उचलत असून ही कायदेशीर कायदेशीर संरक्षण टिम तयार केली आहे.”
– डॉ. सचिन पाटील अध्यक्ष, मध्यवर्ती माई