
बाळापूर, (ता.प्र.). तालुक्यातील उरळ पोलिस स्टेशन अंतर्गत ३० ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी विविध ठिकाणी पाच अवैधरित्या देशी दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई करण्यात येवून मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. उरळ पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या मोरगाव सादीजन येथे पहिल्या कारवाईत विलास सोळुंखे याच्या जवळून देशी दारूचे २७ कॉर्टर किंमत २१६० तसेच निळ्या रंगाच्या ड्रममध्ये २०० लीटर सडवा किंमत २१ हजार रुपये त्याचप्रमाणे १५ लीटर गावरान हातभट्टीची दारू किंमत १५०० असा एकूण २४ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर दुसऱ्या कारवाईत मोरगांव सादीजन येथे गजानन सोळंके याचे जवळून देशी दारूचे क्वॉर्टर तसेच गावरान हातभट्टी दारू असे एकूण ३४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्याचप्रमाणे तिसरी कारवाई अंत्री मलकापूर येथे वासुदेव डाबेराव याच्या जवळून १०० लीटर सडवा किंमत १० हजार रुपये तसेच २ प्लास्टिक कॅनमध्ये प्रत्येकी २५ लीटर गावरान हातभट्टीची दारू एकूण १० लीटर गावठी हातभट्टीची दारू किंमत अंदाजे ५ हजार असा एकूण १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तासगावात अमली पदार्थविरोधात मोठी कारवाई, एकाला अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त
ही कारवाई पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली उरळ पोलिस स्टेशनचे ठाणेदार एपीआय पंकज कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश कार्यदे, अरुण मुंडे, विजयसिंग झाकडें, भाऊराव मोहाडे, मोहबूब खान, रघुनाथ नेमाडे, संतोष भोजने, जावेद बेग, नागेश अंबुळकर व महिला कर्मचारी पल्लवी काळे यांनी केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
चौथ्या कारवाईत अंत्री मलकापूर येथे सिध्दार्थ तायडे जवळून देशी दारूचे २४ कॉर्टर किंमत २१६० रूपए असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला तर पाचवी कारवाई स्वरुपखेड येथे करण्यात आली असून रामभाऊ धुळे याच्या जवळून देशी दारूचे २८ क्वॉटर किंमत ११२० तसेच गावठी दारू एकूण ७७ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्व आरोपिंविरुध्द महाराष्ट्र दारू बंदी कायदा अन्वये कारवाई करण्यात आली.
पुणे-नगर महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; जखमींचा आकडाही आला समोर