झाडावर कार आदळून चालक ठार (संग्रहित फोटो)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढापुरी (ता. शिरुर) येथे पुणे-नगर महार्गावर एम एच १२ यु सि ३६८६ हि ईर्टीगा गाडी नगरवरून पुणेच्या दिशेने जात असताना पाठीमागून आलेल्या एम एच १४ सि डब्ल्यू ४१५५ या लग्झरी बसची ईर्टीगाला जोरदार धडक बसली. त्यानंतर लग्झरी पुन्हा समोरील एम एच १९ सि एक्स ४८८४ या लग्झरी बसवर आदळून अपघात झाला. दरम्यान रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक मारुती पासलकर, पोलीस हवालदार विलास आंबेकर, संतोष पवार, संदीप जगदाळे, महिला पोलीस हवालदार विद्या बनकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर नागरिकांनी जखमींना उपचारासाठी शिरुर व शिक्रापूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी मोठी वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांनी क्रेनच्या मदतीने रस्त्यावरील वाहने बाजूला करत वाहतूक कोंडी सुरळीत केली.
जखमी प्रवाशांची नावे
या अपघातात शेरखान अजीज मुल्ला (वय ५२ रा. – चऱ्होली आळंदी रोड जि. पुणे), सिद्धार्थ अशोक इंगळे (वय २९ रा. शिरला अंधारे ता. पातुर जि. अकोला), सौरभ रामचंद्र देशमुख (वय २७, असिक असद शेख वय ४०), चित्रा रमेश जोशी (वय ६५), राज पंजाबराव सुरवारे (वय २७ तिघे रा. खामगाव जि. बुलढाणा), कैस्सार जुबेर शेख (वय ३२), गुड्डू छेगझास (वय 35 दोघे रा. छत्रपती संभाजीनगर), सचिन श्रीकिसन तायडे (वय ३२ रा. मंगळूर नवघरे ता. चिखली जि. बुलढाणा), बंडू जवाहर जगताप (वय ४९ रा. चिंचवड जि. पुणे), अमित वासुदेव सावंग (वय ४१), अनिल वासुदेव सावंग (वय ४२ दोघे रा. धामणा ता. अकोला जि. अकोला), पृथ्वीराज राहुल इंगळे (वय २० रा. शेगाव ता. शेगाव जि. बुलढाणा), प्राची केदार बर्वे (वय ३८ रा. शिवाजीनगर पुणे), संगीता शंकर माहुरे (वय ३७ रा. हिंजवडी गावठाण ता. मुळशी जि. पुणे), व काव्या सचिन विधाटे (वय १० रा. बाणेर पुणे) हे प्रवासी जखमी झाले आहेत. रांजणगाव पोलिसांनी सर्व प्रवाशांची रुग्णालयात जाऊन चौकशी केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार संतोष पवार हे करत आहेत.






