सुनेच्या प्रेमात दिवाना झाला सासरा; तिला स्पर्श करायचा होता म्हणून..., जन्मदाता मुलासोबत काय केले... (फोटो सौजन्य-X)
Uttar Pradesh Crime News In Marathi: दररोज आपल्याला अनेक विचित्र प्रेमकथा पाहायला आणि ऐकायला मिळतात. उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील सासू-सून प्रकरण माहितच असेल. आपल्या होणाऱ्या सासूवर प्रेम करणारा जावई तिच्यासोबत पळून गेला. या प्रेमकथेसारखाच एक विचित्र प्रकार उत्तर प्रदेशातील आग्रा येथेही पाहायला मिळाला. येथे एका वडिलांनी आपल्या मुलाचे लग्न एका मुलीशी लावून दिले , मात्र या विवाह सोहळ्यात सासरेच नवं वधूच्या प्रेमात पडले. प्रेम इतके वाढले की त्याने स्वतःच्या मुलाची हत्या केली. काय आहे संपूर्ण प्रकरण?
१४ मार्च रोजी आग्राच्या लधमदा (जगदीशपुरा) या गावात होळीच्या दिवशी २६ वर्षीय पुष्पेंद्र चौहानची त्याच्याच घरात हत्या करण्यात आली. या हत्येचे अनेक वेगवेगळे पैलू सतत समोर येत होते. पण, जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला तेव्हा सर्वांना धक्का बसला. अहवालात चाकूने हत्या झाल्याची पुष्टी झाली. तसेच, तपासात हे हत्याकांड दुसऱ्या कोणी नसून स्वतः वडिलांनीच केले असल्याचे उघड झाले. आता आरोपी वडिलांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
पोलिसांनी सांगितले की, होळीच्या दिवशी पुष्पेंद्र आणि त्याचे वडील चरण सिंह यांच्यात एखाद्या गोष्टीवरून वाद झाला. वाद इतका वाढला की रागाच्या भरात वडिलांनी स्वतःच्या मुलाला लोखंडी रॉडने मारून त्याची हत्या केली. एवढेच नाही तर दिशाभूल करण्यासाठी वडिलांनी छातीवर असलेल्या जखमेत काडतूस घातला. या घटनेचा पोलिसांकडून चार महिने तपास सुरु होतो. या तपासातून सासरे स्वतःच्या सुनेवर प्रेम करत होते. मुलाला हे कळताच तो भांडला. यावर वाद वाढत गेला. रागाच्या भरात वडिलांनी मुलाला ठार मारले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
तपासात असे दिसून आले की, आरोपीची सुनेवर वाईट नजर होती. भांडणानंतर मुलगा वेगळा होऊन मथुरा येथे राहू लागला. खून आत्महत्या असल्याचे दाखवण्यासाठी जखमेत एक काडतूस ठेवण्यात आला होता. पोलिसांनी गुरुवारी आरोपी वडिलांना अटक करून तुरुंगात पाठवले. घटनेच्या दिवशी लधमदा येथील रहिवासी चरण सिंग यांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली. त्यांनी सांगितले की मुलगा पुष्पेंद्र चौहानने छातीत गोळी झाडून आत्महत्या केली आहे.
एसीपी लोहा मंडी मयंक तिवारी म्हणाले की, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृताच्या छातीत दोन सेंटीमीटर जखम असल्याचे उघड झाले आहे. मृत्यू धारदार शस्त्राने झाला आहे. छातीत जखमेतून एक काडतूस बाहेर आला. तरीही, अहवालात मृत्यूचे कारण गोळी नसून धारदार शस्त्र असल्याचे म्हटले आहे. एकामागून एक पुरावे गोळा करण्यात आले. कॉल डिटेल्समधून बरीच माहिती मिळाली.
डीसीपी सिटी सोनम कुमार म्हणाले की, पुष्पेंद्र होळीच्या दिवशी आग्र्याला एकटाच घरी आला होता. सुनेला सोबत न आणण्यावरून वडिलांमध्ये भांडण झाले. त्यावेळी वडील आणि मुलगा दोघेही दारूच्या नशेत होते. रागाच्या भरात वडिलांनी मुलाच्या छातीवर चाकूने वार केले, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. खून आत्महत्या म्हणून दाखवण्यासाठी, जखमेत एक काडतूस आणि पिस्तूल ठेवण्यात आले होते. पोलिसांना पहिल्या दिवसापासूनच वडिलांवर संशय होता. त्याला नजरेखाली ठेवण्यात येत होते. पुरावे मिळाल्यानंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आले.