Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh Crime: डोळ्यात मिरचीपूड, फावड्याच्या दांड्याने वार अन् सासऱ्याची हत्या; शिक्षिका सुनेचा थरारक कट, कारण काय?

उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथे संपत्तीच्या वादातून शिक्षिका सुनेने सासऱ्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली. सासऱ्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून फावड्याच्या लाकडी दांड्याने वार करण्यात आले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचाही प्रयत्न झाला. पोलिसांनी चार तासांत सुनेसह चौघांना अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 01, 2026 | 01:37 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • संपत्तीच्या वादातून शिक्षिका सुनेने सासऱ्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप.
  • डोळ्यात मिरचीपूड टाकून फावड्याच्या लाकडी दांड्याने वार करून हत्या.
  • पोलिसांनी चार तासांत मुख्य आरोपी सुनेसह चौघांना अटक केली.
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शिक्षिका असलेल्या सुनेने आपल्या सासऱ्याची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. सुनेने आधी डोळ्यात मिरचीपूड टाकली त्यांनतर इतर साथीदारांच्या मदतीने फावड्याच्या लाकडी दांड्याने डोक्यावर गंभीर वार करून त्यांचा जीव घेतला. हत्या केल्यांनतर मृतदेहाची विल्हेवाट देखील लावण्याचा प्रयत्न केला. या घटनेने खळबळ उडाली आहे. घडलेली घटना उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील ही घटना आहे.

Palghar Crime: 8 महिन्यांच्या बाळाला घेऊन माहेरी निघाली अन् घडलं भयंकर; सासऱ्याच्या धक्क्याने सुनेचा जागीच मृत्यू

काय घडलं नेमकं?

मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव सच्चाराम गुप्ता असे आहे. सच्चाराम गुप्तता यांना दोन मुले आहेत. त्यांची मोठी सून शोभा हिची मागणी होती की सासऱ्याने सगळी संपत्ती तिच्या नावावर करावी. मात्र सच्चाराम यांना आपल्या दोन्ही मुलांना संपत्तीचा समान वाटा द्यायचा होता. याच कारणावरून गेल्या अनेक दिवसांपासून कुटुंबात वाद सुरू होता आणि हे प्रकरण दिवाणी न्यायालयापर्यंतही पोहोचले होते. तरीही वाद काही मिटला नाही. यामुळे सुनेने आपल्या सासऱ्यांची हत्या करण्याचं ठरवलं.

कशी केली हत्या?

सुनेने सासऱ्यांना वाटाघाटीच्या बहाण्याने घरी बोलावून घेतले. गप्पा मारत असतांना हा वाद विकोपाला गेला. शोभाने सासऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली, ज्यामुळे ते वेदनेने जमिनीवर कोसळले. त्यांनतर तिथे आधीच उपस्थित असलेल्या रमेश गुप्ता आणि धनई यादव या कथित डॉक्टराने त्यांना पकडून ठेवले, तर शोभाने फावड्याच्या लाकडी दांड्याने सासऱ्यांच्या डोक्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात सच्चाराम यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी श्रीकांत चौहान नावाच्या व्यक्तीला बोलावून मृतदेहाचा चेहरा कपड्याने बांधण्यात आला आणि रात्रीच्या वेळी तो शेजारच्या रिकाम्या भूखंडात फेकून देण्यात आला.

आरोपी अटकेत

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली. मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी केवळ चार तासांच्या आत या प्रकरणाचा छडा लावून मुख्य आरोपी सुनेसह चौघांना अटक केली आहे. हत्येत वापरलेला लाकडी दांडा आणि इतर महत्वाचे पुरावे पोलिसांनी हस्तगत केले आहे. या सर्व आरोपींवर संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

लग्न कर नाहीतर…, तिने लग्नाला नकार दिला, बाॅयफ्रेंडने गर्लफ्रेंडचा गळा आवळत मृतदेहाला जिवंत जाळले; मध्य प्रदेशातील घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात.

  • Que: हत्येमागील प्राथमिक कारण काय होते?

    Ans: संपत्तीच्या वाटपावरून सुरू असलेला वाद.

  • Que: पोलिसांनी किती आरोपींना अटक केली?

    Ans: मुख्य आरोपी सुनेसह एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली.

Web Title: Uttar pradesh crime chilli powder in the eyes a blow with a shovel handle and the murder of the father in law a teacher daughter in laws chilling plotwhat was the motive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
2

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
3

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.