Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh Crime: ‘सॉरी आई-बाबा, गेम नाही सोडू शकत..’, 3 बहि‍णींची 9 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या, सुसाईड नोटमुळे खळबळ

गाझियाबादमध्ये ऑनलाइन गेमिंग अॅपच्या टास्कमुळे तीन अल्पवयीन बहिणींनी नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. खोलीत गेमशी संबंधित फोटो व सुसाईड नोट सापडली असून पोलीस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 04, 2026 | 12:20 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • गाझियाबादमधील भारत सिटी सोसायटीत 16, 14 व 12 वर्षीय बहिणींची सामूहिक आत्महत्या
  • ऑनलाइन कोरियन गेममधील ‘शेवटचा टास्क’ आत्महत्येशी संबंधित असल्याचा संशय
  • खोलीत गेमचे फोटो व सुसाईड नोट सापडली; पोलीस सखोल तपास करत आहेत
उत्तर प्रदेश: उत्तरप्रदेश येथील गाझियाबादमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. तीन अल्पवयीन बहिणींनी इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. निशिका (16), प्राची (14) आणि पाखी (12) असे आत्महत्या करणाऱ्या तिघींची नावे आहेत. हि घटना गाझियाबादच्या तिला मोड पोलीस स्टेशन परिसरात भारत सिटी सोसायटीमध्ये घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला तेव्हा धक्कदायक माहिती समोर आली.

Madhyapradesh Crime: भयंकर! २ महिने सतत अत्याचार, १२ वर्षीय चिमुकली झाली गर्भवती आणि…; काय घडलं हॉस्टेलमध्ये?

काय घडलं नेमकं?

गाझियाबादमधील तिला मोड येथील भारत सिटी सोसायटीमध्ये रात्री 2 वाजताच्या सुमारास, तीन जण पडल्याचा आवाज ऐकू आला. लोकांनी घटनास्थळी धाव घेत तिन्ही बहिणींचे मृतदेह पाहून सर्वांना धक्का बसला. पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली. घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचली. तिन्ही बहिणींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू आधीच झाला होता.

कारण काय?

या तिन्ही बहिणींना ऑनलाइन गेमिंग अॅप्सचे व्यसन होते. त्या सतत गेम खेळत होत्या. ऑनलाईन गेममध्ये एक टास्क देण्यात आला होता. कुटुंबातील सदस्यांच्या मते, तिन्ही मुली सुमारे एक वर्षापासून ऑनलाइन गेम खेळत होत्या. गेमच्या शेवटच्या टप्प्यात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शेवटच्या वेळी भेटणे आणि सर्वांचे फोटो काढणे समाविष्ट होते. त्यांनतर सर्वांना एका खोलीत बंद करायचे होते. त्यांनतर कोरियन ऑनलाइन गेममध्ये आत्महत्या करण्याचा टास्क होता, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

मुलींच्या खोलीत काय?

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. एसीपी स्वतः घटनेचा तपास करत आहेत. आर्थिक कारणामुळे कोविड-19 साथीच्या आजारापासून तिन्ही मुली शाळेत जात नव्हत्या. कोरियन ऑनलाईन मोबाइल गेमच्या नमुन्यातील छायाचित्र त्यांच्या खोलीत विखुरलेली आढळली. गेमचा अंतिम ध्येय पूर्ण केल्यानंतर हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे दिसून आले. या प्रकरणात एक सुसाईड नोटही जप्त करण्यात आली आहे. आता पुढे काय समोर येत याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

सुसाईड नोटमध्ये काय?

सुसाईड नोटमध्ये मुलींनी लिहिले, “माफ करा, आई आणि बाबा, मी खेळणे थांबवू शकत नाही.” सुसाईड नोटमध्ये असेही म्हटले आहे की, “या डायरीत लिहिलेले सर्व काही खरे आहे. कृपया ते वाचा. आता ते वाचा… माफ करा, आई आणि बाबा…”

Nagpur Crime: भयंकर! वर्षभर अल्पवयीन मुलीवर लैंगिक छळ, ब्लॅकमेलिंग, अन्…; नागपूरमधील संतापजनक घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: तिन्ही बहिणींनी आत्महत्या का केली?

    Ans: प्राथमिक तपासात ऑनलाइन गेमिंग अॅपमधील टास्कमुळे टोकाचा निर्णय घेतल्याचा संशय आहे.

  • Que: घटनास्थळी पोलिसांना काय आढळले?

    Ans: मुलींच्या खोलीत कोरियन ऑनलाइन गेमशी संबंधित छायाचित्रे आणि सुसाईड नोट मिळाली.

  • Que: पोलीस पुढे काय तपास करत आहेत?

    Ans: गेमिंग अॅप, मोबाईल डेटा, सुसाईड नोट आणि कुटुंबीयांचे जबाब नोंदवून तपास सुरू आहे.

Web Title: Uttar pradesh crime ghaziabad is shaken three minor sisters commit mass suicide by jumping from the ninth floor what was the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 10:24 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
2

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
3

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
4

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.