हिंगोली जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख उंचावतोय; ठोस पाऊले उचलण्याची नागरिकांची मागणी
काय घडलं नेमकं?
मध्यप्रदेश येथील खुरई येथे शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह आहे. या वसतिगृहात पिडीत अल्पवयीन मुलगी येथे राहत होती. ती आठव्या इयत्तेत शिकत होती. या हॉस्टेलमध्ये एक तरुण नेहमी भाजी देण्यासाठी येत होता. तो स्वत:ऑटोचालक आहे. त्याची नजर या मुलीवर पडली. त्याने एक दिवस जबरदस्तीने तिच्या रूममध्ये प्रवेश केला. त्याच वेळी तिच्यावर त्याने बलात्कार केला. एवढेच नाही तर याबाबत कुणाला सांगतले तर मारून टाकण्याची धमकी ही दिली. यामुळे ती मुलगी घाबरली. याचाच गैर फायदा त्याने घेतला. तो सतत हॉस्टेलमध्ये येत होता. एवढेच नाही तर ज्या ज्या वेळी तो येत होता, त्या त्या वेळी तो मुलीवर अत्याचार करत होता. मुलगी ही भीतीपोटी सर्व काही सहन करत होती. हा सगळा प्रकार सतत २ महिने सुरु होता.
या अत्याचाराने पीडित मुलगी गर्भवती झाली. मात्र एक दिवस तिच्या पोटात खूप दुखत असल्याची तक्रार तिने वॉर्डनकडे केली. त्यानंतर तिच्या पालकांना बोलावण्यात आले. नंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. हे ऐकून तिच्या आई वडिलांच्या पायाखालची वाळू सरकली. हॉस्टेल प्रशासन ही हादरून गेले. पोलिसांनी तिला विश्वासात घेत याबाबत चौकशी केली. हे सर्व कसे आणि कोणामुळे झाले याची चौकशी तिच्याकडे करण्यात आली. त्यांनतर तिने घडलेली सर्व घटना पोलिसांना सांगितली.
पोलिसांनी या घटनेतील नराधम आरोपी अल्ताफ याला अटक केली आहे. त्याने सप्टेंबर 2025 मध्ये तो विद्यार्थिनीच्या खोलीत शिरून तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. दरम्यान या घटनेने शासकीय वसतिगृहांच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मद्यधुंद कारचालकाची अनेक वाहनांना धडक; भरधाव कारने अपघात केला, घराचे गेटही तोडले
Ans: मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील खुरई येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात सप्टेंबर 2025 पासून ही घटना घडली.
Ans: भाजीपाला पुरवणारा ऑटोचालक अल्ताफ याने धमकी देत सलग दोन महिने १२ वर्षीय मुलीवर अत्याचार केले.
Ans: पोटदुखीची तक्रार झाल्यानंतर तपासात मुलगी गर्भवती असल्याचे समोर आले आणि पोलिस चौकशीत संपूर्ण प्रकार उघड झाला.






