
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
बबलू याची दीड वर्षांची मुलगी जिज्ञासा हिचा अचानक मृत्यू झाला होता. मुलीची आई खुशबू हिने जुन्या वैमनस्यातून गावातीलच सुरेंद्र, मंशाराम आणि अंकित यांच्यावर विटा-दगड मारल्याचा व मुलीला उपचारासाठी नेऊ न दिल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. मात्र, शवविच्छेदन (पोस्टमाॉर्टम) अहवालात चिमुकलीचा मृत्यू दगड लागल्याने नाही, तर गळा आवळल्याने झाल्याचे उघडकीस आले, ज्यामुळे पोलिसांचा संशय थेट मुलीच्या बापावर गेला. पोलिसांनी आरोपी पिता बबलू याला ताब्यात घेत त्याची चौकशी करायला सुरुवात केली. तेव्हा त्याने स्वत केलेल्या गुन्हयाची कबुली दिली.
Dharashiv Crime : ऊसतोड उचलीच्या पैशांवरुन अल्पवयीन मुलाचे अपहरण; धाराशिव तालुक्यातील घटनेनं खळबळ
कारण काय?
आरोपी बबलूची मुलगी सतत आजारी असायची. तिच्या उपचारासाठी त्याने खूप कर्ज घेतले होते. २० जून रोजी तो घरी आला तेवहा शेजाऱ्यांनी त्याच्या आणि त्याच्या कुटुंबावर गुन्हा दाखल केल्याचे समजले. यावरून शेजाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आणि खोट्या प्रकरणात फसवण्यासाठी त्याने स्वतःच्याच आजारी मुलीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर शेजाऱ्यांच्या दगडफेकीत ती मारली गेल्याचा बनाव रचला.
पोलिसांपुढे खोटा बनाव टिकू शकला नाही आणि…
पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांनी जेव्हा त्याच्या पत्नीकडे चौकशी सुरू केली, तेव्हा दगडफेक झालीच नव्हती हे सत्य बाहेर येईल या भीतीने तो हादरला होता. डॉक्टरांच्या चर्चेवरून मुलीचा मृत्यू गळा दाबल्यानेच झाला असल्याचे स्पष्ट झाल्यावर, त्याने आपल्या भावाच्या मदतीने डॉक्टर आणि पोलिसांवरच आरोप करत बचावाचा प्रयत्न केला होता. मात्र, अखेर पोलिसांच्या तपासापुढे त्याचा खोटा बनाव टिकू शकला नाही. निष्पाप मुलीच्या हत्येप्रकरणी नराधम बापाची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. पोलीस कोठडीत असतांना बबलू आपल्या केलेल्या कृत्यावर पश्चाताप व्यक्त करत आहे.
Kalyan News: कल्याणमध्ये चाललंय तरी काय? मद्यधुंद तरुणाचा चक्क पोलिसांवर हल्ला, घटना CCTVमध्ये कैद
Ans: विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी.
Ans: पोस्टमॉर्टम अहवालातून.
Ans: आरोपी पित्याला अटक केली.