Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: थरारक घटना! 23 वर्षीय तरुणीकडून आई-भावाची निर्घृण हत्या; कारण काय?

उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये 23 वर्षीय तरुणीने कौटुंबिक वाद आणि मानसिक अस्वास्थ्याच्या पार्श्वभूमीवर आई व भावाची लोखंडी सळीने हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 23, 2026 | 02:42 PM
लेकीबाबत 'ते' शब्द ऐकताच बाप संतप्त; रॉडने वार करून थेट हत्याच

लेकीबाबत 'ते' शब्द ऐकताच बाप संतप्त; रॉडने वार करून थेट हत्याच

Follow Us
Follow Us:
  • तरुणीकडून आई आणि भावाची निर्घृण हत्या
  • लोखंडी सळीने हल्ला; दोघांचा जागीच मृत्यू
  • कौटुंबिक वाद व मानसिक अस्वास्थ्याचा संशय
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २३ वर्षीय तरुणीने स्वतःच्या आईची आणि भावाची हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील मुरादाबादमध्ये बुधवारी (२२ एप्रिल) रोजी घडली.

घटना कशी उघडकीस आली

रात्री आठच्या सुमारास गावच्या चौकीदरम्यान पोलिसांना या घटनेची माहिती दिली, तेव्हा ही बाब समोर आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा अंगणात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दोन मृतदेह पाहून अधिकारीही चक्रावून गेले. आरोपी मुलीचे नाव अनिता असे आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. तर या घटनेत मृत्यू झालेल्यांची नाव मुन्नी देवी आणि त्यांचा मुलगा राजीव असे आहे.

Nesco Drugs Case : नेस्को ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 11 आरोपींना अटक, मुख्य आरोपी भारत सोडून फरार

कशी केली हत्या?

आरोपी मुलगी अनिताने घरातील लोखंडाच्या सळीने आणि गुरांना बांधण्याच्या खुंट्याने आई आणि भावावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. घराच्या अंगणात आई आणि मुलाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. या क्रूर कृत्यामुळे संपूर्ण गाव हादरले असून, घटनेनंतर परिसरात मोठी शांतता पसरली आहे.

का केली हत्या?

कुटुंबातील सदस्यांनी असा दावा केला आहे की, अनिताची मानसिक स्थिती गेल्या काही काळापासून ठीक नव्हती. हे कुटुंब आधीच आर्थिक आणि सामाजिक दडपणाखाली होते, त्यातच अनिताच्या वागण्यावरून घरात सतत तणावाचे वातावरण असायचे. बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास याच तणावाचा स्फोट झाला आणि त्याचे रूपांतर या भीषण हत्याकांडात झाले.

मोठ्या भावाच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय पोस्ट मार्टमसाठी पाठवले आहेत. आरोपी अनिताची मानसिक स्थिती तापासाठी तिची वैद्यकीय चाचणीही केली जाणार आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

उत्तर प्रदेशात ऑनर किलिंग! संतापलेल्या वडिलांनी 17 वर्षीय मुलीची केली निर्घृण हत्या

उत्तर प्रदेश येथून एक ऑनर किलिंगची धक्कादायक घटना समोर समोर आली आहे. आपल्या मुलीचे प्रेमसंबंध असल्याची कुणकुण लागल्याने संतापलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीची गळा आवळून निघृण हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना बिजनौर जिल्ह्यातिल नगिना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिन्जाहेडी गावात घडली. या ऑनर किलिंगच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

UttarPradesh Crime: उत्तर प्रदेशात ऑनर किलिंग! संतापलेल्या वडिलांनी 17 वर्षीय मुलीची केली निर्घृण हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे ही घटना घडली.

  • Que: हत्येसाठी काय वापरण्यात आले?

    Ans: लोखंडी सळी आणि गुरांना बांधण्याचा खुंटा वापरण्यात आला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपी तरुणीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Uttar pradesh crime shocking incident 23 year old woman brutally murders mother and brother what was the motive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.