Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UttarPradesh Crime: ‘या 6 महिन्यांच्या बाळाचं काय करायचं?’…पुढच्या काही मिनिटांत घडलं असं, की पोलिसही हादरले!

मेरठमध्ये सहा महिन्यांच्या साहिलच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांच्या तपासानुसार, आईचे कथित प्रेमसंबंध आड येत असल्याने प्रियकराने बालकाचा गळा आवळून हत्या करून मृतदेह नाल्यात फेकल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 02, 2026 | 11:23 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मेरठमध्ये सहा महिन्यांच्या साहिलच्या हत्येप्रकरणी आईच्या कथित प्रियकराला अटक.
  • पोलिसांच्या माहितीनुसार, मुलगा नात्यात अडथळा ठरत असल्याने हत्या केल्याचा आरोप.
  • सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास सुरू.
उत्तरप्रदेश: इंस्टाग्रामवर झाली ओळख… प्रेमात बदललं नातं… आणि मग आला एक प्रश्न—’या बाळाचं काय करायचं?’ पोलिसांच्या तपासानुसार, याच प्रश्नानंतर घडलेली घटना ऐकून कुणाच्याही अंगावर काटा येईल. अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुकल्याचा मृतदेह नाल्यात सापडला आणि तपासात समोर आलेल्या कथित घटनाक्रमाने सर्वांनाच हादरवून सोडलं. घडलेली घटना उत्तरप्रदेश येथील मेरठमधील आहे.

काय घडलं नेमकं?

सहा महिन्यांच्या चिमुकल्याचा नाव साहिल असे आहे. साहिल हा सहारनपूर जिल्ह्यातील रहिवासी इम्रान आणि शबाना यांचा मुलगा होता. इम्रान हा पंजाबमधील एका राईस मिलमध्ये मजुरीचे काम करतो. 13 जुलै रोजी एका कचरा वेचणाऱ्या व्यक्तीला नाल्यात मृतदेह आढळून आल्यावर पोलीस तपास सुरू झाला. पंजाबवरून परतलेल्या इम्रानने पत्नी आणि मुलगा गायब असल्याचे पाहून पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी शबानाला हापूरमधून ताब्यात घेतले. मुलांबाबत विचारणा केली असता तिने सांगितले की शबानाच्या प्रियकरने सांगितले की त्याला एका मित्राकडे ठेवले आहे. मात्र जेव्हा अज्ञात बालकाचा मृतदेह मिळाल्याची माहिती मिळताच त्याने तिथे जाऊन कपडे आणि फोटों पहिले तेव्हा त्याने आपल्या पोटच्या गोळ्याला ओळखले.

आई-मुलाच्या नात्याला काळीमा! मद्यधुंद अवस्थेत मुलाकडून आईवर लैंगिक अत्याचार, आरोपीला स्थानिकांकडून बेदम मारहाण

कशी केली हत्या?

शबाना ही मेरट येथे आपल्या सहा महिन्याच्या चिमुकल्यासोबत राहत होती. त्यादरम्यान तिची इंस्टाग्रामवर विशाल कुमार नावाच्या तरुणाशी ओळख झाली. हळहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. १२ जुलैच्या रात्री शबाना औषध आणण्याच्या बहाण्याने मुलाला घेऊन बस स्थानकावर पोहोचली, जिथे विशाल आधीच तिची वाट पाहत होता.

त्यावेळी त्याने शबानाला सांगितले की जर हे मुलं सोबत राहिले तर त्यांचे कुटुंब या नात्याला स्वीकारणार नाही. मुलाला एका परिचित व्यक्तीकडे सुरक्षित सोडून येतो असे सांगून तो चिमुरड्या साहिलला सोबत घेऊन गेला. त्यांनतर विशालने एका कॉलनीजवळ नेऊन बालकाचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह उघड्या नाल्यात फेकून दिला. यानंतर तो शबानाकडे परतला आणि तिला हापूर येथील आपल्या घरी घेऊन गेला.

आरोपी अटकेत

याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी (31 जुलै) रात्री आरोपी विशालला अटक केली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील कारवाई सुरू आहे. घडलेल्या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे.

अविवाहित तरुणांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; लग्न लावून देण्याचे आमिष दाखवले जायचे अन् नंतर…

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा प्रकार कुठे घडला?

    Ans: उत्तर प्रदेशातील मेरठ येथे.

  • Que: मृत बालकाचे वय किती होते?

    Ans: अवघे 6 महिने.

  • Que: पोलिसांनी कोणाला अटक केली आहे?

    Ans: आईच्या कथित प्रियकराला अटक करण्यात आली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Web Title: Uttar pradesh crime what should be done with this 6 month old baby what happened in the next few minutes left even the police shaken

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.