मद्यधुंद अवस्थेत मुलाकडून आईवर लैंगिक अत्याचार, आरोपीला स्थानिकांकडून बेदम मारहाण
अविवाहित तरुणांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; लग्न लावून देण्याचे आमिष दाखवले जायचे अन् नंतर…
अंगावर काटा आणणारी ही घटना मुझफ्फरपूरच्या सकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तत्काळ आरोपीला आपल्या ताब्यात घेतले. तथापि, स्थानिकांच्या तावडीतून आरोपीला सोडवण्यासाठी त्यांना मोठी धडपड करावी लागली. जमलेली लोक आरोपी मुलावर इतकी भडकली होती की मारहाणीत जीव जाईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. अनेक प्रयत्नांनंतर स्थानिकांनी आरोपीला जमावाच्या तावडीतून सोडले आणि पोलिस ठाण्यात घेऊन गेले.
स्थानिकांनी एकत्रित केला हल्ला
ही संपूर्ण घटना मुजफ्फरपुर जिल्ह्यातील सकरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मझौलिया पंचायतीच्या एका गावात घडून आली आहे. तीन दिवसांपूर्वी, मुलगा मद्यधुंद अवस्थेत घरी परतला आणि त्याने आपल्याच आईचे लैंगिक शोषण केले. नंतर घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. हा संताप पुढे इतका वाढला की जमावाने एकत्रिपण आरोपी मुलावर हल्ला केला आणि त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी आरोपीला केली अटक
घटनेची माहिती मिळताच सकरा पोलीस ठाण्याचे पोलीस आरोपीला अटक करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी स्थानिक आरोपीला मारहाण करत होते. अशात पोलिसांनी बराच प्रयत्न करुन आरोपीला जमावाच्या तावडून सोडले आणि गाडीत बसवून पोलिस ठाण्यात घेऊन गेले. या घटनेचे फुटेज देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. पोलिस सध्या घटनेचा तपास करत असून पुराव्यांच्या आणि जबाबाच्या आधारावर आरोपीवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.






