Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh: 15 दिवसांत संपला प्रेमविवाह; परिचारिकेची गळफास घेऊन आत्महत्या, सुसाईड नोटमुळे गूढ वाढले

बरेलीतील इज्जतनगरमध्ये प्रेमविवाहानंतर अवघ्या 15 दिवसांत परिचारिका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये कोणालाही जबाबदार धरले नाही. पती-पत्नीतील वादामुळे प्रकरण गूढ बनले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 29, 2026 | 02:41 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • प्रेमविवाहानंतर 15 दिवसांत आत्महत्या
  • सुसाईड नोटमध्ये कुणालाही जबाबदार नाही
  • पती-पत्नीतील वादाचा संशय, तपास सुरू
उत्तर प्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. प्रेयसी आणि प्रियकराने १५ दिवसांपूर्वी प्रेमविवाह केले मात्र १५ दिवसातच तिने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून मृत तरुणीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आत्महत्या करणारी तरुणी ही व्यवसायाने परिचारिका असल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने सुसाईड नोट लिहून ठेवले होते. मात्र असं काय घडलं की १५ दिवसातच तिने आत्महत्या केली.

Navi Mumbai Crime: गुन्ह्यामध्ये मुलांची नावे कमी करण्यासाठी दहा ते पंधरा कोटींची मागणी – किरण चिचकर यांची तक्रार

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील मृतक तरुणी आणि बदायूं येथील तिचा प्रियकर यांनी काही दिवसांपूर्वीच प्रेम विवाह केला होता. या दोघांची भेट इज्जतनगरमधील एका खासगी रुग्णालयात झाली होती, जिथे ते दोघे एकत्र काम करत होते. कामाच्या निमित्ताने झालेल्या या ओळखीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. त्यांनी समाजाचा विचार न करता साधारण १५ दिवसांपूर्वी कोर्ट मॅरेज केले. लग्नानंतर ती आपल्या पतीसोबत सासरी गेली होती, मात्र काही दिवसातच ती पुन्हा आपल्या भावाकडे इज्जतनगरला परतली होती. शुक्रवारी रात्री उशिरा या तरुणीने आपल्या खोलीत गळफास घेतला. तिचा भाऊ घरी आल्यानंतर हा प्रकरण समोर आला. त्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांना तिथे एक सुसाईड नोट सापडली.

सुसाईड नोट मध्ये काय?

सुसाईड नोटमध्ये तिने स्पष्टपणे नमूद केले आहे की, ती स्वतःच्या इच्छेने हे पाऊल उचलत असून तिच्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरले जाऊ नये. या सुसाईड नोटमुळे या प्रकरणाचे आणखी गूढ वाढले आहे. मात्र तिने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

तरुणीच्या पतीनेही केला आत्महत्येचा प्रयत्न

मृत तरुणीच्या भावाने सांगितले की, लग्नांनंतर काही दिवसातच या जोडप्यामध्ये वाद सुरु झाले होते. ५ दिवसांपूर्वी तिच्या पाटीनेही विष प्रश्न करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता, पण वेळीच उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले होते. 2 दिवसांपूर्वी तो तरुण बरेलीला आला होता आणि त्यावेळी दोघांमध्ये काही कारणावरून मोठे भांडण झाले होते, तरीही त्या तरुणीने आपल्या भावाला याबद्दल काहीही सांगितले नाही.

संघर्षाचे आयुष्य

या तरुणीचे आयुष्य सुरुवातीपासून संघर्षाचे होते, कारण तिचे आई- वडील आणि नंतर सांभाळ करणाऱ्या मामा-मामींचेही निधन झाले होते. ती आपल्या भावासोबत राहत होती आणि नोकरी करून घर सांभाळत होती. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

Buldhana Accident: मेहकरजवळ भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; 2 ठार, 23 जखमी

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्येचे कारण काय सांगितले आहे?

    Ans: सुसाईड नोटमध्ये कोणालाही जबाबदार धरले नसल्याने कारण स्पष्ट नाही.

  • Que: विवाहाला किती दिवस झाले होते?

    Ans: फक्त 15 दिवसांपूर्वीच प्रेमविवाह झाला होता.

  • Que: पोलीस काय तपास करत आहेत?

    Ans: पती-पत्नीतील वाद आणि इतर कारणांचा सखोल तपास सुरू आहे.

Web Title: Uttar pradesh love marriage ends in just 15 days nurse commits suicide by hangingsuicide note deepens the mystery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.