लातुर जिल्ह्यातील अहमदपूर येथील बागवान कुटुंबातील सदस्य पिकप वाहनाने सैलानी बाबांच्या दर्शनासाठी जात होते. मात्र वाटेतच काळाने झडप घेतली आणि हा दुर्दैवी अपघात घडला आहे. सकाळी वाहन चालकाला वाहन चालवत असतांना झोपेची डुलकी आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यांनतर अपघात जखमी भाविकांनी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर 23 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर सध्या मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र या दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Buldhana Crime: चित्रपटालाही लाजवेल असा ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’! तीनदा विष देऊनही अपयश, शेवटी रचला भयानक कट
बुलढाणा जिल्ह्यातून एक चित्रपटाला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. पतीने आपल्या शिक्षक पत्नीला मारण्याचा तीन वेळा प्रयत्न केला मात्र अपयश हाती आलं, शेवटी असा कट रचला की एखाद्या थ्रिलर चित्रपटालाही लाजवेल. हत्या झालेल्या पत्नीचे नाव वृषाली प्रकाश गावंडे असे आहे. तर आरोपी नवऱ्याचे नाव प्रकाश गावंडे असे आहे. ही घटना संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावात घडली आहे.
काय नेमकं प्रकरण?
मृतक वृषाली गावंडे या पिंपळगाव काळे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका होत्या. 2 मार्च रोजी वृषाली गावंडे त्यांच्या स्कुटीवरुन शाळेत जात असताना त्यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली होती. यात त्यांचा मृत्यू झाला होता. याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. पोलीस घटनास्थळावर जेव्हा पोहोचेल तेव्हा आरोपी प्रकाश हा आपल्या पत्नीच्या मृतदेहाच्याशेजारी बसून रडत होते. त्यामुळे पोलिसांना सुरुवातीला हा दुर्दैवी अपघात असल्याचे वाटले आणि त्यांनी फार तपास काही केला नाही. मात्र वृषाली गावंडे यांच्या माहेरच्या मंडळींनी घातपाताचा संशय व्यक्त केला. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि धक्कादायक माहिती समोर आली.
जुन्या वादातून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण; रत्नागिरीतील राजीवडा पूल येथील घटना
Ans: चालकाला वाहन चालवताना झोप लागल्याने नियंत्रण सुटले.
Ans: या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला.
Ans: जखमींवर मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.






