
crime (फोटो सौजन्य: social media)
काय नेमकं प्रकरण
पहिल्या पत्नीच्या आत्महत्येनंतर संजयवर मानसिक आणि शारीरिक छळाचे आरोप करण्यात आले होते. याच आरोपांच्या आधारे त्याला तुरुंगवासही भोगावा लागला होता. मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने एका वर्षांपूर्वी रोशनी नावाच्या महिलेसोबत लग्न केलं. लग्नानंतर संजय हा रोशनीला सतत त्रास देत होता. पतीच्या छळाला कंटाळून रोशनीने घर सोडलं आणि आपल्या बहिणीकडे राहू लागली.
मात्र चार दिवसांपूर्वी संजय तिच्याकडे आला आणि सुखाने संसार करूया असे सांगून तिला आपल्या घरी परत नेले. कुटुंबीयांनी सुद्धा पीडितेची समजून काढून रोशनीला परत तिच्या सासरी पाठवलं. पण तरी सुद्धा त्या दोघांमध्ये सतत वाद होते. घटनेच्या दिवशी, पीडिता आणि आरोपीमध्ये असाच वाद झाला आणि त्यावेळी रागाच्या भरात पतीने रोशनीवर तव्याने वार करून निर्घृण हत्या केली.
घटना कशी उघडकीस आली
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित रोशनीच्या भावाने तिला वारंवार फोन केले तेव्हा त्याला बहिणीचा फोन बंद असल्याचे समजले. त्यानंतर तो लगेच तिच्या घरी गेला मात्र दाराला कुलूप लागलं होत. त्याने नातेवाइकांना बोलावून घराचा दरवाजा तोडले तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला. घरात रोशनीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.
आरोपी फरार
पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास करायला सुरुवात केली आहे. चौकशीदरम्यान पीडितेच्या शेजाऱ्यांनी आरोपी संजयला घरातून पळून जातांना पाहिलं असल्याचे समोर आलं. रोशनीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवर पोलिसांनी संजयविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पती फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
Ans: कौटुंबिक वादातून पतीने रागाच्या भरात तव्याने वार करून रोशनीची हत्या केली.
Ans: पहिल्या पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी छळाचे आरोप होते आणि तो तुरुंगातही गेला होता.
Ans: आरोपी पती फरार असून त्याचा शोध सुरू आहे; हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.