
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
आकाश बीटेकचा विधार्थी
आकाशदीप हा बिहारमधील गया येथील रहिवासी आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो आला होता. तो नॉलेज पार्क परिसरातील दिल्ली टेक्निकल कॅम्पस (DTC) मध्ये बीटेक सीएसच्या पहिल्या वर्षात शिकत होता. तो येथील एसएनएच रेसिडेन्सी हॉस्टेलमध्ये राहत होता. मंगळवारी आकाशदीपचा रूममेट जेव्हा कॉलेजमधून परतला, तेव्हा त्याला खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. संशय आल्याने त्याने खिडकीतून पहिले असता आकाशदीप गळफास घेतलेल्या स्थितीत दिसला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून त्याला खाली उतरवले आणि रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासापुर्वीच मृत घोषित केले.
सुसाईड नोटमध्ये काय?
आक्षदीपच्या खोलीत जी सुसाईड नोट सापडली आहे, त्यामध्ये त्याने अभ्यासाच्या तणावाचा उल्लेख केला आहे. त्याने पालकांसाठी चिठ्ठीत लिहिले की, मम्मी- पप्पा मी तुमचे पैसे बर्बाद करू इच्छित नाही. अभ्यासाच्या दबावामुळे मी ट्रस्ट असून माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये, असेही त्याने नमूद केले आहे. एसीपी अरविंद कुमार यांनी सांगितले की, मुलाच्या कुटुंबाला या घटनेची माहिती देण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
Ans: उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील नॉलेज पार्क परिसरातील हॉस्टेलमध्ये.
Ans: अभ्यासाचा प्रचंड ताण आणि पालकांचे पैसे वाया घालवायचे नाहीत ही भावना.
Ans: कुटुंबाला माहिती देण्यात आली असून प्रकरणाचा सर्वांगीण तपास सुरू आहे