काय घडलं नेमकं?
ही धक्कादायक घटना २० डिसेंबर रोजी घडली. एका हॉटेलमध्ये कंपनीच्या सीईओचा वाढदिवस आणि नवीन वर्षाची पार्टी आयोजित करण्यात आली. या पार्टीला पीडित तरुणीलाही निमंत्रित करण्यात आले होते. ती मॅनेजर पदावर काम करत होती. त्यामुळे तिचा सर्व जण ओळखीचे होते. त्यामुळे ती ही बिनधास्त पार्टीला गेली. रात्री उशिरापर्यंत ही पार्टी चालली. या पार्टीत मद्यप्राशन करण्यात आले होते. सर्वांनी दारू घेतली होती. त्यामुळे पीडित महिला मॅनेजरची प्रकृती बिघडली. म्हणून तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने आरोपींनी स्वतःच्या कारमध्ये तिला बसवले.
त्याकारमध्ये कंपनीची महिला एक्झिक्युटिव्ह हेड, तिचा पती आणि सीईओ उपस्थित होते. त्यांनी तिला घरी नेण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवले. त्याआधी पार्टीत आलेल्या सर्वांनी एकएक करून घरी पाठवण्यात आले. सर्वात शेवटी पीडित तरुणीला कारमध्ये टाकण्यात आले. वाटेत तिला सिगारेटमधून अमली पदार्थ देण्यात आला. ज्यामुळे ती बेशुद्ध पडली. या स्थितीचा फायदा घेत आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने धावत्या कारमध्ये अत्याचार केला.
दुसऱ्या दिवशी पीडित तरुणी शुद्धीवर आली. त्यावेळी तिला आपल्या सोबत काही तरी चुकीचे झाले असल्याचा अंदाज आला. आपल्यावर अत्याचार झाल्याचे तिला समजलं त्यामुळे ती हादरून गेली. अत्याचार करणारे हे दुसरे तिसरे नसून ऑफिसामध्ये होते हे ही तिच्या लक्षात आले. वेळ न घालवता पोलिसांत धाव घेतली. शिवाय या लोकांविरोधात तक्रार नोंदवली. पोलीस पुढील कारवाई करत आहे.
Ans: राजस्थानच्या उदयपूरमध्ये, पार्टीनंतर चालत्या कारमध्ये अत्याचार झाला.
Ans: कंपनीचा CEO, महिला एक्झिक्युटिव्ह हेडचा पती आणि एका महिलेचा सहभाग असल्याचा आरोप आहे.
Ans: वैद्यकीय अहवाल व जबाबांच्या आधारे तपास करून कठोर कारवाई केली जाणार आहे.






