
crime (फोटो सौजन्य: social media)
प्रियकराने केले आपल्याच कुटुंबियांवर आरोप
मृत महिलेच्या प्रियकराने आपल्याच कुटुंबियांवर प्रेयसीची हत्या केल्याचे आरोप केले आहे. प्रियकराच्या म्हणण्यानुसार, त्याच्याच कुटुंबातील सदस्यांनी महिलेचा खून केला. संतोष कुमारने त्याच्या आई-वडिलांवर आणि कुटुंबातील इतर सदस्यांवर हत्येचा आरोप केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 1 वाजताच्या सुमारास मृत महिला तिचा प्रियकर संतोषला भेटण्यासाठी गेली. त्यावेळी, तिचा संतोषच्या कुटुंबियांशी वाद झाला आणि याच भांडणात पीडितेची निर्घृण हत्या करण्यात आली.
भयंकर अवस्थेत आढळला मृतदेह
मृत महिला ही सिव्हिल इंजीनिअर म्हणून कार्यरत होती. पीडित महिलेवर कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आले. बाराबंकी येथील मसौली पोलीस स्टेशन परिसरातील शहाबपुर चौकात पीडितेचा मृतदेह आढळून आला. सकाळी ८ वाजताच्या सुमारास संतोषने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महिलेचा मृतदेह भयंकर अवस्थेत आढळून आला. पीडितेच्या डोक्याच्या मागील बाजूवर गंभीर वार करण्यात आले होते. पोलिसांनी महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे.
धक्कादायक ! कलाकेंद्रातील तरुणीवर सामूहिक अत्याचार; पीडितेला जबरदस्तीने लॉजवर नेलं अन्…
Ans: बाराबंकीतील मसौली पोलीस ठाणे हद्दीत शहाबपुर चौकात.
Ans: विवाहित महिला सिव्हिल इंजिनिअर.
Ans: प्रियकर संतोष कुमारने आपल्या कुटुंबीयांवर आरोप केला आहे.