नेमकं काय घडलं?
पीडित तरुणाला एक अनोळखी नंबरवरून फोन आला. तिने आपलं नाव अमरिन असल्याचे सांगितले. या दोघांमध्ये बोलणं वाढत गेलं. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. पीडीत तरुणाला हे ट्रॅप असल्याचा काहीच अंदाजा नव्हता. गोड बोलून आरोपी तरुणीने तरुणाला आपल्या जाळ्यात अडकवलं. त्यानंतर दोघांनी व्हिडीओ कॉलवर बोलण्यात सुरूवात केली. व्हिडीओ कॉल दरम्यान अमरीनने व्हिडीओ कॉलवर पीडित तरुणाचे प्रायव्हेट क्षण रेकॉर्ड केले. एके दिवशी त्या खाजगी क्षणांच्या व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग दाखवत, अमरीन अरुणला म्हणाली की, “जर तुला तुझी बदनामी व्हायला नको असेल, तर पाच लाख रुपयांची व्यवस्था कर. नाहीतर, हा व्हिडिओ व्हायरल होईल.” पीडित तरुणाने आपली बदनामी होऊ नये म्हणून पीडित अरुणने त्या तरुणीला पैसे देण्यास सुरुवात केली.
एके दिवशी अमरिनने पीडित तरुणाला तिच्या घरी बोलावलं. त्यावेळी अमरिन ही घरात एकटी नव्हती तर तिची आई आणि दोन पुरुष तिच्यासोबत होते. तेव्हा पीडित तरुणाला दरवाजा बंद करून धमकावण्यात आले. अमरीन आणि तिच्या साथीदारांनी पिडीतेकडे आणखी पैश्यांची मागणी केली. पैसे न दिल्यास त्याचे अश्लील व्हिडीओ व्हायरल केले जाणार असल्याचं सांगितलं. भीतीपोटी तरुणाने आरोपींना जवळपास 1 लाख 7 हजार रुपये आणि सोन्याची एक चेन दिली. मात्र, तरीसुद्धा आरोपींनी त्याला धमक्या देऊन पैशांची मागणी करणं सुरूच ठेवलं.
आरोपी अटकेत
तरुण या सगळ्याला कंटाळला आणि थेट पोलीस स्टेशन येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. अरुणच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी तपास केला आणि आरोपी अमरीन, शमीना, आफताब आणि अतीक यांना अटक केली.
Latur Crime: पतीचं दुसऱ्या महिलेसोबत लफडं, सततच्या छळाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल
Ans: व्हिडीओ कॉलवर खासगी क्षण रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करण्यात आलं.
Ans: सुमारे 1.07 लाख रुपये व सोन्याची चेन.
Ans: अमरीन, शमीना, आफताब आणि अतीक यांना अटक केली.






