vadgaon maval murder case in real brothers
वडगाव मावळ : राज्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वडगाव मावळमध्ये भावांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. वडगावमावळमध्ये सख्खा भाऊच पक्का वैरी ठरला आहे. घरगुती वादाच्या कारणांवरुन थेट भावाचा भावाने जीव घेतला. तुझी नात माझ्या मुलाला का देत नाहीस, या शिल्लुक कारणावरून सख्ख्या भावाने सख्ख्या भावावर जीवघेणा हल्ला केला. छातीवर चाकू सारख्या धारदार शस्त्राने वार करून मोठ्या भावाचा खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. २०) दुपारी दीड वाजताच्या सुमारास वडगाव मावळ रेल्वे स्टेशनच्या मोकळ्या जागेत घडली. या प्रकारामुळे वडगाव मावळमध्ये एकच खळबळ उडाली आहे. भावाने भावाचा खून केल्यामुळे सर्वांनी हळहळ व्यक्त केली आहे.
वडगाव मावळमधील या हत्येच्या प्रकरणामध्ये उदेश पारधी उर्फ उदेश नाबाब राजपूत (वय ४५, मूळ रा. मुरवाडा स्टेशन, जि. कटनी, मध्य प्रदेश) असे खून झालेल्या भावाचे नाव आहे. तर त्याचा सख्खा भाऊ नटू शबस्ता नाबाब राजपूत (वय ४०) असे आरोपी भावाचे नाव आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत उदेश पारधी राजपूत व आरोपी नटू राजपूत हे सख्खे भाऊ आहेत. ते काही दिवसांपासून वडगाव मावळ रेल्वे स्टेशनच्या मोकळ्या जागेत राहत होते. उदेश यांच्या मुलीची मुलगी आरोपी त्याच्या मुलासाठी मागत होता. यातून शुक्रवारी त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने नटू याने मोठ्या भावाला चाकू सारख्या धारदार शस्त्राने वार करत ठार मारले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. वडगाव मावळ पोलीस तपास करीत आहेत.
नागपूर हिवाळी अधिवेशनासंबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पुण्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. बारामतीमध्ये देखील नात्यामधील मुलावर हल्ला करुन खून केल्याची घटना घडली होती. आपल्या नात्यातील एका मुलीकडे पाहतो व तिच्याशी सतत बोलतो या कारणावरून एका १९ वर्षीय युवकाचा बारामती शहरातील प्रगतीनगर याठिकाणी गुरुवारी (ता. १९) रात्री कोयत्याने वार करून खून करण्यात आला. या घटनेने बारामती हादरली आहे. अनिकेत सदाशिव गजाकस (रा. देसाई इस्टेट,बारामती) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून हा युवक बारामती नगर पालिकेच्या घंटा गाडीवर चालक म्हणून काम करत होता. या प्रकरणी त्याचा भाऊ अभिषेक सदाशिव गजाकस यांनी शहर पोलिसात फिर्यादी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलिसांनी नंदकिशोर पंजाबराव अंभोरे (रा. प्रगती नगर, बारामती), महेश नंदकुमार खंडाळे (रा. तांदुळवाडी रोड, जिजामाता नगर, बारामती) व संग्राम खंडाळे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.