'...तर मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायला अडचण होणार'; संतोष देशमुख हत्या प्रकरणावर धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य
बीडमधील संतोष देशमुख प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापलं असून मंत्री धनंजय मुंडे आरोपीला वाचवताहेत, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या सर्व आरोपांना आता धनंजय मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझ्याकडून बोललं जाणार, त्यावर मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायला अडचण होणार, अशी प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे, त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.
मंत्री धनंजय मुंडे सध्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात आहेत. यावेळी त्यांनी बीड संतोष देशमुख प्रकरणावर भाष्य केलं. धनंजय मुंडे म्हणाले,’ विरोधकांनी काहीतरी बोलणार. त्यावर माझ्याकडून बोललं जाणार. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर द्यायला अडचण होणार. जे काही असेल एकदा काय दूध का दूध पाणी का होऊ द्या. मुख्यमंत्र्याच्या उत्तरातून ते कळलं’.
‘माझ्या सहकाऱ्याच्या संबंधांना तर जर एखाद्या घटनेची चर्चा चालू असेल. त्या चर्चेचे उत्तर मुख्यमंत्री फडणवीस देत असतील, तर परंपरेनुसार मी उपस्थित राहिलो नाही. त्या शिवाय दुसरे कुठेलेही कारण नाही. विरोधकांनी काहीतरी बोलत आहे. ते तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या उत्तरातून कळाले असेल. मी सुरुवातीपासून म्हणत आहे, हे घरातलं झालेलं भांडण आहे. त्यातून संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे.
‘या प्रकरणात तीव्र भावना सगळ्यांची आमची आहे. एस.आय.टी नेमलेली आहे. याचा तपास होणार आहे. कोण होतं काय होतं, घटनेच्या आदल्या दिवशी काय झालं..यामध्ये मकोका लावण्याच्या बाबतीत मुख्यमंत्री फडणवीस जे काही बोलले, तो फक्त या प्रकरणात लावायचा आहे, की यापुढे अशा प्रकरणात लावायचा आहे. माननीय मुख्यमंत्री यांनी निवेदन केला आहे, स्वाभाविक सर्वांचा समाधान झालं आहे,असेही ते म्हणाले.
‘माझ्या नावावर सदनात जो आरोप करण्यासाठी आहे. शेवटी पोलीस तपासणार आहेत. पोलीस यंत्रणा आहे, की सीआयडीकडे तपास दिला आहे विरोधी पक्षनेत्यानं काय बोलावं मला सांगता येत नाही. वाल्मिक कराड नागपुरात कुठे आहेत, तेही सांगावे. पोलिसांनी त्यांना पकडण्याचे काम केलं असतं. या घटनेमध्ये ज्यांनी कोणी अशा पद्धतीने हत्या केली, त्यांना सर्वांना फाशी झाली पाहिजे, अशी माझी भूमिका असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.