Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMC Election 2026: अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून गुंड आंदेकरच्या कुटुंबातील दोघांना उमदेवारी; तुरुंगातून लढवणार निवडणूक

माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचे नातेवाईक गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर याची गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर आंदेकर टोळीतील अंतर्गत वाद अधिक चिघळले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 30, 2025 | 04:10 PM
Pune Municipal Corporation Election 2026 Marathi News :

Pune Municipal Corporation Election 2026 Marathi News :

Follow Us
Close
Follow Us:
  • अजित पवारांकडून आयुष कोमकर हत्या प्रकरणातील दोन महिला आरोपींना उमेदवारी
  • गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे हिलादेखील उमेदवारी जाहीर केली होती
  • सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या सध्या 5 कोटी 40 लाख रुपयांच्या खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत
Pune Municipal Corporation Election 2026 Marathi News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या पक्षाकडून पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणातील दोन महिला आरोपींना उमेदवारी देण्यात आली आहे. कोमकर हत्या प्रकरणात तुरुंगात असणाऱ्या आरोपी सोनाली कोमकर आणि लक्ष्मी कोमकर यांना पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक २३ मधून सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिकीटावरून निवडणूक लढवणार आहेत. या दोघीही तुरुंगांतून निवडणूक लढवणार आहेत.

Local Body Election : ठाकरे गटाला मोठा धक्का ; ठाण्यातील माजी उपमहापौरांचा राजकीय संन्यास

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने यापूर्वी गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे हिलादेखील उमेदवारी जाहीर केली होती. त्यानतंर आता पुण्यातील गुन्हेगारीचा इतिहास असलेल्या आंदेकर कुटुंबातील दोघांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पुणे गुन्हेगारीमुक्त करण्याचे आश्वासन देणाऱ्या अजित पवारांवर कितपत विश्वास ठेवायचा, असा प्रश्नही यावरून उपस्थित होत आहे.

दरम्यान, बंडू आंदेकर आणि त्यांच्या कुटुंबातील लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आदेकर यांना महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली होती. यानंतर लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यंनी २७ डिसेंबरला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर यांना उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणूक, भाषण किंवा घोषणाबाजी करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे आंदेकर यांना निवडणूक प्रक्रियेदरम्यान कठोर नियमांचे पालन करावे लागणार आहे.

दरम्यान, सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या सध्या 5 कोटी 40 लाख रुपयांच्या खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असून त्या दोघीही कारागृहात आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार आता बंडू आंदेकर आणि संबंधितांना प्रचार करताना कोणत्याही प्रकारचा गोंधळ, शक्तीप्रदर्शन किंवा नियमभंग करता येणार नाही. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

India Politics: “एक-एक घुसखोराला हाकलवून…”; अमित शहांचा ममता बॅनर्जींवर प्रहार

नेमकं प्रकरण काय?

माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचे नातेवाईक गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर याची गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर आंदेकर टोळीतील अंतर्गत वाद अधिक चिघळले. या प्रकरणात बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (वय 70, रा. नाना पेठ) याच्यासह 13 जणांविरोधात खून तसेच मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या खटल्यातील आरोपी आणि बंडू आंदेकर याचा मुलगा कृष्णा उर्फ कृष्णराज आंदेकर (36) हा आयुष कोमकरच्या हत्येनंतर फरार झाला होता. काही दिवसांपूर्वी बंडू आंदेकर यांनी सार्वजनिकपणे “कृष्णाचा शोध द्या, अन्यथा त्याचा एन्काउंटर होईल,” असा दावा केल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कृष्णा आंदेकर स्वतःहून समर्थ पोलीस ठाण्यात हजर झाला. या संपूर्ण प्रकरणामुळे पुण्यातील गुन्हेगारी व राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे.

 

 

 

 

Web Title: Pune municipal election 2026 ajit pawars ncp gives candidature to two members of gangster andekars family they will contest the election from jail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 04:09 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Pune Crime
  • Vanraj Andekar

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: उमेदवारीवरून राडा! अजित पवारांना धक्का; ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ
1

Maharashtra Politics: उमेदवारीवरून राडा! अजित पवारांना धक्का; ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ

निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
2

निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Pune Politics : महापालिका निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला धक्का; दत्ता बहिरट करणार राष्ट्रवादीत प्रवेश
3

Pune Politics : महापालिका निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला धक्का; दत्ता बहिरट करणार राष्ट्रवादीत प्रवेश

Pune Election 2026 NCP : ठरलं तर! पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार; रोहित पवारांनी स्पष्टचं सांगितलं
4

Pune Election 2026 NCP : ठरलं तर! पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार; रोहित पवारांनी स्पष्टचं सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.