
Navi Mumbai: प्रेमप्रकरणातून थेट घरात घुसून उडवल्या गोळ्या; एका बहिणीच्या पाठीत गोळी घुसल्याने प्रकृती गंभीर तर दुसरीचे...
कोपरखैरणे सेक्टर १ मधील धोबी कुटुंबाच्या घरात गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. रात्रीची वेळ असताना घरातील पुरुष मंडळी कामानिमित्त बाहेर गेली होती. हीच संधी साधत आरोपी अर्जुन चौहान याने घरात प्रवेश केला आणि तिथे उपस्थित असलेल्या दोन सख्या बहिणींना लक्ष्य करत त्यांच्यावर थेट पिस्तुलातून गोळीबार केला.
या अचानक झालेल्या हल्ल्यात २० वर्षीय तरुणीच्या पाठीत गोळी लागल्याने ती गंभीर जखमी झाली, तर २२ वर्षीय मोठ्या बहिणीच्या कानाला गोळी चाटून गेली. गोळीबारानंतर आरोपी तातडीने घटनास्थळावरून पसार झाला. घटनेनंतर घाबरलेल्या आईने दोन्ही जखमी बहिणींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या एका तरुणीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
घरात घुसून करण्यात आलेल्या या भयंकर हल्ल्यामुळे संपूर्ण कोपरखैरणे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित अर्जुन चौहान याला ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यामागील नेमके कारण काय होते आणि त्यासाठी वापरलेले पिस्तूल त्याने कुठे लपवले होते, या दिशेने पोलीस सध्या कसून चौकशी करत आहेत.
Ans: नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर १ परिसरातील एका घरात ही घटना घडली आहे.
Ans: या हल्ल्यात दोन सख्या बहिणी जखमी झाल्या असून, एका २० वर्षीय तरुणीच्या पाठीत गोळी लागल्याने तिची प्रकृती गंभीर आहे, तर २२ वर्षीय बहिणीच्या कानाला गोळी चाटून गेली.
Ans: घटनेनंतर फरार झालेल्या संशयित अर्जुन चौहान याला कोपरखैरणे पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.