Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चोरीच्या संशयावरून दलित तरुणाला विहिरीत उलटे करून मारले, कायद्याचे राज्य आणि मानवाधिकारांवर गंभीर प्रश्न ?

चोरीच्या संशयावरून दलित तरुणाला निर्घृणपणे मारहाण करून चक्क विहिरीत उलटे लटकवण्यात आल्याची अतिशय संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे कायद्याचे राज्य आणि मानवाधिकारांवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून संतापाचे वातावरण झाले आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: Jun 08, 2026 | 09:15 PM
VBA got furious after Dalit man beaten and hanged upside down on well in Hisar,

VBA got furious after Dalit man beaten and hanged upside down on well in Hisar,

Follow Us
Follow Us:

जगभरात विविध देश एआय क्षेत्रात प्रगती करत असून भारतात मात्र अजूनही जातीयवादावरून एकमेकांचे लचके तोडण्याचे काम राजरोसपणे चालू आहे. हरियाणातील हिसारमधून पुन्हा नव्याने एक धक्कादायक घटना समोर आली असून चोरीच्या संशयावरून दलित तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. चोरीच्या संशयावरून त्या तरुणाला निर्घृणपणे मारहाण करून चक्क विहिरीत उलटे लटकवण्यात आल्याची अतिशय संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे कायद्याचे राज्य आणि मानवाधिकारांवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून संतापाचे वातावरण झाले आहे.

हरियाणातील हिसार जिल्ह्यातील हांसी भागातील सोरकी या गावात हि धक्कादायक घटना घडली आहे. याबाबतचा एक व्हिडियो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून याबाबत आता पोलिसांनीदेखील ऍक्शन घेतली आहे. व्हिडियोत दिसत असल्याप्रमाने काही लोक एका दलित युवकाला पाण्याची मोटार चोरी करत असल्याच्या संशयावरून जबरदस्त मारहाण करत आहेत. मात्र, त्यानंतर लोकांच्या जमावाने त्या युवकाला चक्क विहिरीत उलटा टांगून लटकावला. यादरम्यान तो युवक रडत, ओरड असल्याचे तसेच गयावया करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडियो वायरल झाल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. याप्रकरणी पोलिसांनी पाच लोकांविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचे समजत आहे. या घटनेवरून परिसरात मोठी खळबळ उडाली असून आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे. हि घटना १ जून रोजी घडल्याचे समाजात असून आता याची व्हिडियो मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.

Wardha Crime: क्रूरतेची परिसीमा! हुंड्यासाठी छळ, मारहाण अन् पत्नीला माहेरी सोडून खाजगी व्हिडिओ केले व्हायरल

आरोपींवर कारवाई करण्याची ‘वंचित’ ची मागणी

याबाबत आता वंचित बहुजन आघाडीने देखील भूमिका घेतली असून आरोपींवर कारवाईची मागणी केली आहे. वंचितच्या अधिकृत X अकाऊंटवरून याची माहिती देण्यात आली. या पोस्ट मध्ये स्पष्ट करण्यात आले कि, “हरियाणातील हिसार जिल्ह्यातील हांसी भागातील सोरकी गावात एका दलित तरुणासोबत झालेली अमानुषता अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद आहे. चोरीच्या संशयावरून त्या तरुणाला निर्घृणपणे मारहाण करून विहिरीत उलटे लटकवल्याच्या घटनेमुळे कायद्याचे राज्य आणि मानवाधिकारांवर गंभीर प्रश्न निर्माण होतात. जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात, तेव्हा दलित, वंचित आणि असुरक्षित गटांच्या सुरक्षेची खात्री करण्याबाबत सरकार किती गंभीर आहे, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. जर गुन्हेगारांना त्वरित आणि कठोर शिक्षा झाली नाही, तर अशा घटनांची तीव्रता वाढते.”

“भाजपशासित राज्यांमध्ये घडणाऱ्या अशा क्रूर घटनांसाठी सरकारने उत्तर दिलेच पाहिजे. देशभरात दलित, आदिवासी आणि महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. आमची हरियाणा सरकारकडे मागणी आहे की, या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोरतम शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून भविष्यात दलित आणि आदिवासींशी अमानुषपणे व क्रूरतेने वागण्याचे धाडस कोणालाही होणार नाही,” असाही विनंती पोस्टमधून करण्यात आली.

Crime News: अनोळखी मृतदेहापासून खुनाचा उलगडा; नवघर पोलिसांनी २ तासांत आरोपींना जेरबंद केले

Web Title: Vba got furious after dalit man beaten and hanged upside down on well in hisar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 09:15 PM

Topics:  

  • Atrocity Act
  • Atrocity Case
  • Vanchit Bahujan Aghadi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.