अल्पवयीन मुलीचा अंघोळ करताना बनविला व्हिडिओ, धमकी देऊन अनेकवेळा केला लैंगिक अत्याचार (फोटो सौजन्य-X)
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने अल्पवयीन मुलीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला होता. यानंतर आरोपीने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मुलीवर अनेकवेळा लैगिंक अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध बीएनएस आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ही घटना आग्रा येथील ट्रान्स यमुना पोलीस स्टेशन परिसरात घडल्याचे सांगितले आहे. शेजारी राहणाऱ्या सुमेर खान नावाच्या तरुणाने अल्पवयीन मुलीचा अंघोळ करत असतानाचा गुप्तपणे व्हिडिओ बनवला आणि नंतर मुलीचे अपहरण केले. त्यानंतर आरोपीने मुलीवर लैगिंक अत्याचार केला.
दरम्यान, 18 नोव्हेंबर रोजी अल्पवयीन मुलगी तिच्या मामाच्या घरी जाण्यासाठी घरातून निघाली होती, परंतु ती तेथे पोहोचली नाही. त्यानंतर तिचा शोध घेण्यात आला, मात्र तरीही अल्पवयीन मुलगी सापडली नाही. 19 नोव्हेंबर रोजी अल्पवयीन मुलगी वाईट अवस्थेत ती तिच्या घरी पोहोचली. तिने तिच्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. शेजारचा मुलगा आरोपी सुमेर खानने तिला बंदुकीच्या जोरावर त्याच्या मित्राच्या घरी नेले आणि तेथे तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने गुपचूप ती आंघोळ करत असताना तिचा व्हिडिओ बनवला होता. यानंतर आरोपीने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अनेकवेळा लैगिंक अत्याचार केला.
गुन्हा दाखल झाल्यापासून आपल्या मुलीवर आपले म्हणणे बदलण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप अल्पवयीन मुलीच्या आईने केला आहे. या प्रकरणी लैगिंक अत्याचार आणि भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्याच्या इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेतील आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
तसेच काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीची ओळख करत तिचा लपून अश्लील व्हिडीओ तयार करून तिला ‘ब्लॅकमेल’ करीत वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अखेर या त्रासाला कंटाळून पिडीत मुलीने विषारी द्रव्य प्राशन करत आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न देखील प्रयत्न केला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तरूणाविरुद्ध आयपीसी कलम ३७६, ३७६ (२), (एन), ३७६ (२) (जे), ५०६, ४२७, पोक्सो ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी २०२४ पासून सुरु होता. कपिल रवींद्र वाल्हेकर (वय १८, रा. कोथरूड) असे गुन्हे दाखल झालेल्याचे तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एका १७ वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे.