Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे पैशांच्या वादातून महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून कालव्यात फेकण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 30, 2026 | 10:02 AM
कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Follow Us
Follow Us:
  • पैशांच्या वादातून महिलेची हत्या केल्याचा पोलिसांचा संशय
  • मृतदेहाचे ९ तुकडे करून कालव्यात फेकल्याचा आरोप
  • टॅटूच्या आधारे महिलेची ओळख; दोन संशयितांना अटक
आंध्रप्रदेशच्या विजयवाडा येथून एक हैराण करणारी घटना समोर येत आहे. पैशांवरुन झालेल्या वादात कसाईने टोकाचे पाऊल उचलले आणि संबंधित महिलेवर चाकूने प्रहार करत तिचा खून केला. हद्द तर तेव्हा पार झाली जेव्हा त्याने पुरावे नष्ट करण्यासाठी महिलेच्या शरीराचे लहान तुकडे करायला सुरुवात केली. यानंतर महिलेच्या मृतदेहाचे तुकडे त्याने कालव्यात फेकले. या घटनेने सध्या परिसरात खळबळ उडवली असून महिलेच्या शरीरावरील टॅटूच्या मदतीने तिची ओळख पटल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस घटनेचा तपास करत असून संबंधित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

Crime News: सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद; काडतूस सापडताच हत्येचा उलगडा, सीसीटीव्हीत दोन हल्लेखोर कैद

टॅटूच्या मदतीने पटली महिलेची ओळख

मिळालेल्या माहितीनुसार, इब्राहिमपटनममध्ये एक अज्ञात मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. मृत महिलेची ओळख कल्याणी अशी पटली आहे. सांगितले जात आहे की, कुटुंबियांनी तिच्या हातावरील टॅटू पाहून मृतदेहाची ओळख पटवली. याच्या मदतीने तपास अधिकाऱ्यांना तिची ओळख पटवण्यास मोठी मदत मिळाली.

मटणाचे दुकान चालवत होता आरोपी

तपासादरम्यान पोलिसांना समजले की, आरोपी शफी जो मटणाचे दुकान चालवत होता याचा या प्रकरणाशी मोठा हात आहे. शफी आणि कल्याणीमध्ये जवळचे संबंध होते आणि पैशांवरुन त्यांच्यात वादही होत होते. कल्याणीच्या मुलाशी संबंधित एका जुन्या वादामुळेही त्यांच्या नात्यात कटुता आली होती.

हत्येनंतर मृतदेहाचे ९ तुकडे

तपासातील निष्कर्षांनुसार, १७ सप्टेंबर रोजी आरोपी शफी कल्याणीला भवनीपुरम येथील त्याच्या घरी घेऊन गेला. सांगितले जात आहे की, पैशांवरुन त्या दोघांमध्ये मोठा वाद झाला होता. यानंतर शफीने कथितरित्या चाकूच्या मदतीने कल्याणीचा गळा चिरला आणि जागीच तिला ठार केले. पोलिसांना संशय आहे की, शफीने मृतदेहाला एकूण ९ तुकड्यांमध्ये कापले आणि मग मटणाच्या दुकानात काम करणाऱ्या गुरुवुलुच्या मदतीने मृतदेहाच्या तुकड्यांचा बंदोबस्त केला. सांगितले जात आहे की, या तुकड्यांना त्याने गोल्लापुडी परिसरातील एका थंड पाण्याच्या कालव्यात फेकून दिले.

Thane Crime: ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या; कार्यालयात घुसून गोळीबार, धारदार शस्त्रानेही हल्ला

पोलिसांनी दोघांना केली अटक

सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून शफी आणि त्याचा साथीदार गुरुवुलु यांना अटक करण्यात आली आहे. प्रकरणातील त्यांच्या भूमिकेवर तपास केला जात असून घटनेचा कालानुक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिस घटनेमागील हेतू, दोन्ही संशयितांची वेगवेगळी भूमिका आणि मृतदेह कसा वाहून नेण्यात आला किंवा त्याची कशी विल्हेवाट लावण्यात आली या सर्व बाबींचा तपास करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Web Title: Vijayawada woman murder body cut into 9 pieces tattoo identification canal shafi arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • Andhra Pradesh
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Maharashtra Live breaking News in Marathi:  आशियाई खेळात तिरंदाजी संघाकडून देशाला सातवे सुवर्णपदक
1

Maharashtra Live breaking News in Marathi: आशियाई खेळात तिरंदाजी संघाकडून देशाला सातवे सुवर्णपदक

Crime News: सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद; काडतूस सापडताच हत्येचा उलगडा, सीसीटीव्हीत दोन हल्लेखोर कैद
2

Crime News: सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद; काडतूस सापडताच हत्येचा उलगडा, सीसीटीव्हीत दोन हल्लेखोर कैद

Thane Crime: ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या; कार्यालयात घुसून गोळीबार, धारदार शस्त्रानेही हल्ला
3

Thane Crime: ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या; कार्यालयात घुसून गोळीबार, धारदार शस्त्रानेही हल्ला

इंदापूरच्या पश्चिम पट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ; शेतीपंप, केबलसह डाळिंबाची चोरी, शेतकरी हैराण
4

इंदापूरच्या पश्चिम पट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ; शेतीपंप, केबलसह डाळिंबाची चोरी, शेतकरी हैराण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.