crime (फोटो सौजन्य: social media )
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील माढ्यातील वेणेगाव येथील जय मल्हार कला केंद्राच्या बाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. यात एक जण जखमी झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेत गोळीबार नेमका कोणी केला याची माहिती पोलिसांनी अद्याप उघड केलेली नाही आहे. काल बुधवारी बार्शी येथील कला केंद्रातील एका नर्तिकामुळे एका उपसरपंचां आत्महत्या केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता माढ्यातील जय मल्हार कला केंद्राच्या बाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Mumbai Police : ऑनलाइन फसवणुकीची भीती वाटतेय? मग फॉलो करा मुंबई पोलिसांचा ‘एबीसीडी’ फॉर्म्युला
का झाला वाद?
एकच बैठक लावण्याच्या कारणावरुन हा दोन गटात वाद झाला. याच वादाचे रुपांतर टोकाच्या भांडणात झाले. या भांडणात थेट एका तरुणाच्या डाव्या बाजूच्या मांडीवर गोळीबार करण्यात आला.यात तो गंभीर जखमी झाला आहे. जखमी झालेल्या तरुणाचे नाव देवा कोठावळे असे आहे. तो पंढरपूरच्या वाखरी गावचा रहिवाशी आहे. या घटनेत नेमका गोळीबार कोणी केला हे अद्याप समोर आलेलं नाही. टेंभुर्णी पोलिसांनी त्या आरोपीचे नाव उघड केलेले नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. टेंभुर्णी पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करत तीन जणांना ताब्यात घेतले आहे. वाद झालेले दोन्ही गट पंढरपूरचे असलयाचे समोर आले आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहे. नुकताच बार्शीतील एका नर्तिकामुळे बीडच्या उपसरपंचाने गोळीबार करत आत्महत्या केली. आता दुसऱ्याच दिवशी कला केंद्राबाहेर गोळीबार झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
नर्तिकेसोबतच्या प्रेमसंबंधातून उपसरपंचाने केली आत्महत्या
बीडमधील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (वय 34) यांनी मंगळवारी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. गोविंद बर्गे यांचे पारगाव कला केंद्रातील पूजा गायकवाड (वय 21) या नर्तिकेशी प्रेमसंबंध होते. याच प्रेमसंबंधातून गोविंद बर्गे यांची स्वत:च्या कारमध्ये बसून कानशिलात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मात्र, याप्रकरणात आता गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. आमच्या माणसाचा घातपात झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणात लक्ष घालून नर्तिका पूजा गायकवाड हिच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांनी केली आहे.
Nagpur Crime : नागपूर हादरलं! भररस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार; हल्लेखोरांनी ५० लाख लुटले