Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: विरारमध्ये अज्ञात वाहनाची ६५ वर्षीय वृद्धाला जोरदार धडक; मृत्यू, अपघातानंतर चालक वाहनासह पसार

विरारच्या गडगापाडा ब्रिजवरून जात असलेल्या ६५ वर्षीय वृद्धाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली अन् चालक मदत न करताच घटनास्थळावरून पसार झाला. या अपघातात वृद्धाचा मृत्यू झाला असून, विरार पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 18, 2026 | 02:31 PM
Accident News: विरारमध्ये अज्ञात वाहनाची ६५ वर्षीय वृद्धाला जोरदार धडक; मृत्यू, अपघातानंतर चालक वाहनासह पसार

Accident News: विरारमध्ये अज्ञात वाहनाची ६५ वर्षीय वृद्धाला जोरदार धडक; मृत्यू, अपघातानंतर चालक वाहनासह पसार

Follow Us
Follow Us:
  • अज्ञात वाहनाची वृद्धाला धडक
  • धडक देऊन चालक पसार
  • विरारमध्ये हिट अँड रन
विरार : रस्त्यावरून जात असलेल्या ६५ वर्षीय वृद्धाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यानंतर चालक मदत न करताच घटनास्थळावरून पसार झाल्याची घटना विरार पूर्वेतील गडगापाडा ब्रिजवर घडली. या अपघातात वृद्धाचा मृत्यू झाला. गुरुवारी (१७ सप्टेंबर) सायंकाळी चार ते पाचच्या सुमारास हा अपघात झाला. या प्रकरणी विरार पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : Delhi Crime: दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचारानंतर…

गडगापाडा ब्रिजवर अपघात

महादेव रत्ना सवर (वय ६५, रा. डोंगरीपाडा, शिरगाव, विरार पूर्व) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे पुतणे दामोदर हिरा गावीत (वय २४) यांनी विरार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दामोदर गावीत हे गुरुवारी कामावर असताना त्यांच्या मित्राचा फोन आला. महादेव सवर यांचा अपघात झाल्याची माहिती मित्राने त्यांना दिली. त्यानंतर दामोदर यांनी घटनास्थळी धाव घेतली. महादेव सवर हे विरार पूर्वेतील चंदनसार परिसरातील गडगापाडा नाक्यापासून सुमारे १०० मीटर अंतरावर असलेल्या ब्रिजवरून जात होते. त्यावेळी एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेमुळे सवर गंभीर जखमी झाले.

हेही वाचा : Mumbai: पुण्याचा व्यावसायिक मुंबई विमानतळावरून गायब; मलेशिया ट्रिप रद्द, फोन बंद, परतताच उलगडलं रहस्य

जखमीला मदत न करता चालक पसार

अपघातानंतर वाहनचालकाने जखमी महादेव सवर यांना वैद्यकीय मदत मिळवून दिली नाही. तसेच पोलिसांना घटनेची माहिती न देता तो वाहनासह घटनास्थळावरून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या अपघातात सवर यांचा मृत्यू झाला.

पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी

अपघाताची माहिती मिळताच विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एल. एम. तुरे आणि महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाची ‘ई-साक्ष’ नोंद केली आहे. या प्रकरणी विरार पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६ (१), २८१, १२५ (ए), १२५ (बी) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ आणि १८७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची नोंद गुन्हा रजिस्टर क्रमांक ५५६/२०२६ अशी करण्यात आली आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा आणि चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गारळे करत आहेत.

Web Title: Virar hit and run 65 year old man dies unknown vehicle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Accidendt
  • Accident Case
  • Accident Death
  • Accident News
  • Hit and Run

संबंधित बातम्या

Nashik Crime: गणरायाच्या स्थापनेसाठी कंपनीत गेले; अन् पुन्हा कधीच परतले नाही!, ३३ वर्षीय इंजिनिअर…
1

Nashik Crime: गणरायाच्या स्थापनेसाठी कंपनीत गेले; अन् पुन्हा कधीच परतले नाही!, ३३ वर्षीय इंजिनिअर…

गणरायाच्या मिरवणुकीत ‘मृत्यूचा ट्रेलर’ ! आधी ट्रॅक्टरला धडक, नंतर दुचाकीस्वाराला चिरडले; चालकासह दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
2

गणरायाच्या मिरवणुकीत ‘मृत्यूचा ट्रेलर’ ! आधी ट्रॅक्टरला धडक, नंतर दुचाकीस्वाराला चिरडले; चालकासह दोघांचा मृत्यू, सात जण जखमी

वरई उड्डाणपुलावर मोठी दुर्घटना; ट्रकचा टायर निखळून PSI गंभीर जखमी
3

वरई उड्डाणपुलावर मोठी दुर्घटना; ट्रकचा टायर निखळून PSI गंभीर जखमी

जांभुळवाडीतील दरी पुलावर ट्रकचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू; जखमींचाही आकडा समोर
4

जांभुळवाडीतील दरी पुलावर ट्रकचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू; जखमींचाही आकडा समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.