crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
विरार येथून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. विरारच्या विवा कॉलेजमध्ये नवरात्री निमित्त गरबा सुरू आहे. गरब्यात येणाऱ्या मुलींवर दोन मुलींवर तरुणांनी सोशल मीडियावर केलेल्या अश्लील चॅटमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन तरुणाला अटक करण्यात आली आहे. चॅटमध्ये “एकही हिंदू मुलगी सोडू नका” तसेच इतर अश्लील आणि वादग्रस्त वाक्यांचा समावेश आहे.
व्हॉट्सअॅप चॅटमध्ये काय?
दोन तरुणांनी असे आक्षेपार्ह चॅट केले आहे. या चॅटमध्ये त्यांनी मुलींसोबत शरीरसंबंध ठेवण्याबाबत बोलले आहे. गरब्यात जी हिंदू मुलगी दिसेल तिच्याशी जवळीक कर असा सल्ला व्हॉट्सअॅप चॅटमध्ये देण्यात आल्याचा समोर आला आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी मुलींना कॉलेजमधील कुठला मजला निर्मनुष्य असेही या चॅटमध्ये सांगण्यात आले आहे. या संभाषणात गरब्यात असलेल्या मुलींवर कशा प्रकारे अत्याचार करता येईल असं त्या तरुणाने सांगितले आहे. अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर या चॅटमध्ये करण्यात आल्याचा समोर आलं आहे.
लव्ह जिहादचा कट
या प्रकरणी भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव अशोक शेळके यांनी याला लव्ह जिहादचा कट असल्याचा म्हणत गंभीर आरोप केला आहे. गरबा हा केवळ हिंदूसाठीच अशी भूमिका घेतली आहे.
हिंतेद्र ठाकूर यांचा प्रतिहल्ला
“ज्यांनी हे आरोप केले आहेत त्यांच्या एवढे मूर्ख जगात कुठेही बघायला मिळणार नाही” असे म्हणत माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भाजपने केलेल्या आरोपांची खिल्ली उडवली.तसेच, या गरब्याचा महाविद्यालयाशी काही संबंध नाही. खासगी संस्थेचा हा गरबा असून तो केवळ महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केला जातो. त्यात सुरक्षेचे सर्व नियमांचे पालन होते. गरबा हा सर्वधर्मियांसाठी खुला आहे. कुणावरही बंदी घालणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अल्पवयीन आरोपीला अटक
विरारच्या विवा महाविद्यालयात गुजराथी मित्रमंडळ आणि U238 या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. या गरब्यात येणाऱ्या मुलींसंदर्भात दोन तरूणांने आक्षेपार्ह चॅट व्हायरल झाले आहे. हे चॅट व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विवा कॉलेज प्रशासनाने तत्काळ भूमिका घेत बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अश्लील आणि वादग्रस्त चॅट करणाऱ्या दोन आरोपीपैकी एका अल्पवईन आरोपीला ताब्यात घेतले आहे, तर दुसऱ्याचा शोध सुरु आहे.
Mumbai crime: गरबा खेळणाऱ्या नागरिकांवर सोळाव्या मजल्यावरून फेकली अंडी, मीरारोड येथील घटना