Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उत्तरप्रदेशातील गँगस्टरकडून पुण्यात घरफोड्या, विश्रामबाग पोलिसांनी आवळल्या मुसक्या; तब्बल…

उत्तर प्रदेशातील कुविख्यात 'सनी गँग'मधील गँगस्टरकडून पुण्यात घरफोड्या केल्या जात असल्याचा प्रकार विश्रामबाग पोलिसांनी उघडकीस आणला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 05, 2026 | 09:05 PM
उत्तरप्रदेशातील गँगस्टरकडून पुण्यात घरफोड्या, विश्रामबाग पोलिसांनी आवळल्या मुसक्या; तब्बल...

उत्तरप्रदेशातील गँगस्टरकडून पुण्यात घरफोड्या, विश्रामबाग पोलिसांनी आवळल्या मुसक्या; तब्बल...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : उत्तर प्रदेशातील कुविख्यात ‘सनी गँग’मधील गँगस्टरकडून पुण्यात घरफोड्या केल्या जात असल्याचा प्रकार विश्रामबाग पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या गँगस्टरसोबतच आणखी एकाला अटक करून त्यांच्याकडून तब्बल ६२ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. चोरीतील दागिने त्यांनी पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातील एका लॉजमध्ये ठेवले होते. उत्तरप्रदेशातून पुण्यात आल्यानंतर ते संबंधित लॉजमध्ये राहत असल्याचेही समोर आले आहे.

 

आकाश सुभाष (वय २३, रा. दिल्ली. मुळ. मेरठ, उत्तर प्रदेश) साथीदार जितेंद्र चर्तुवेदी (वय ३२, रा. दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून विश्रामबाग, समर्थ, खडक व भोसरी पोलिस ठाण्यातील एकूण ५ गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक प्रदीप कसबे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अरूण घोडके, सहाय्यक निरीक्षक राजेश उसगावकर, पोलिस अंमलदार सचिन कदम, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, कैलास डुकरे, अनिस शेख व त्यांच्या पथकाने केली आहे.

पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी अक्षरशा उच्छांद घातला आहे. बंद फ्लॅट दिसताच चोरट्यांकडून तो फोडला जात आहे. यामुळे पुणेकर भयभित आहेत. दुसरीकडे पोलिसांकडून या चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, विश्रामबाग परिसरात घरफोडीचा प्रकार घडला होता.

पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही तपासले. तेव्हा चोरटे एका ठिकाणी कैद झाले होते. सीसीटीव्हीचा माग काढत असताना हे चोरटे पुणे स्टेशन परिसरापर्यंत गेल्याचे तसेच ते एका लॉजवर राहिल्याचेही समजले. अधिक तपासात ते रेल्वेने उत्तर प्रदेशात गेल्याचे दिसून आले. पुन्हा चोरटे पुण्यात आल्याची माहिती पोलिस अंमलदार आशिष खरात व अनिस शेख यांना मिळाली होती त्यानूसार, पथकाने या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी गुन्ह्यांची कबूली दिली.

एक महिना उत्तरप्रदेशात पोलिसांचा मुक्काम

विश्रामबाग पोलिसांचे अंमलदार अनिस शेख व आशिष खरात आरोपी उत्तरप्रदेशात गेल्याचे समजताच उत्तरप्रदेशातील मेरठ येथे नई वस्ती परिसरात वेशांतर करून आरोपींची माहिती काढत होते. तब्बल एक महिना पोलिस तिथे वेशांतर करून राहिले आणि त्यांनी आरोपींची माहिती काढली. त्याचवेळी पुन्हा हे आरोपी पुण्यात आल्याचे समजले. लागलीच दोघेही पुण्यात आले.

ओंकारेश्वर पुलावर पकडण्याचा थरार

ओंकारेश्वर पुलाजवळ चोरी करणारे आरोपी थांबल्याचे सजताच साध्या वेशातील पोलिसांनी या ठिकाणी सापळा लावला. चारही बाजूने आरोपींच्या बाजूने जवळ जात अचानक त्यांना पकडले. हा थरार एखाद्या चित्रपटाला लाजवेल असा होता. पकडून या दोघांना पोलिस ठाण्यात आणत चौकशी करून गुन्ह्यांची उकल केली.

आकाश उत्तर प्रदेशातील गँगस्टर

आकाश सुभाष हा उत्तर प्रदेश पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो येथील कुविख्यात सनी गँगमधील गँगस्टर असल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेश पोलिस देखील त्याचा शोध घेत होते. पण, तो सापडत नव्हता. तो दिल्लीत राहत होता. दिल्लीतून पुणे येथे येत चोरी करत होता. चोरीनंतर तो उत्तरप्रदेशात जाऊन चोरीचा माल लपवत असल्याचे समोर आले आहे.

Web Title: Vishrambaug police have arrested thieves from uttar pradesh who were involved in housebreaking

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 09:05 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

हृदयद्रावक! ट्रक-कारच्या धडकेत 18 वर्षीय तरुणीचा अपघाती मृत्यू
1

हृदयद्रावक! ट्रक-कारच्या धडकेत 18 वर्षीय तरुणीचा अपघाती मृत्यू

तू मला शिळे जेवण का देतेस? नशेत असणाऱ्या तरुणाने वडील अन् बहिणीला अक्षरक्ष:..; नेमका विषय काय?
2

तू मला शिळे जेवण का देतेस? नशेत असणाऱ्या तरुणाने वडील अन् बहिणीला अक्षरक्ष:..; नेमका विषय काय?

‘पीएम नवीन योजना’च्या नावाखाली APK फाईल पाठवली अन् ती उघडताच आर्थिक लूट झाली
3

‘पीएम नवीन योजना’च्या नावाखाली APK फाईल पाठवली अन् ती उघडताच आर्थिक लूट झाली

चक्क ! मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पुण्यात घडला धक्कादायक प्रकार
4

चक्क ! मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पुण्यात घडला धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.