Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वेटरने रचले रेल्वे तिकिटांचे रॅकेट; अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के अन् सही वापरत केली लाखोंची कमाई

एका वेटरने रेल्वेच्या तिकीट विकून तब्बल प्रतिमहिना दीड-दोन लाख कमावले. बनावट सही-शिक्क्यांतून व्हीआयपी कोट्यावर मारत होता डल्ला. प्रवाशांकडून तो तिकिटांचे हजारो रुपये घेत होता. काय आहे नेमकं प्रकार?

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 07, 2025 | 02:47 PM
ticket (फोटो सौजन्य- pinterest)

ticket (फोटो सौजन्य- pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

आपल्याला कुठे फिरायला जायचं असलं की आपलं आनंद उत्साह खूप असतो. आपण लवकरात लवकर रेल्वेची तिकीट करायला लागतो.कारण रेल्वेची तिकीट कन्फर्म भेटायला वेळ लागतो आणि इथे आपली धाकधूक वाढत जाते. कन्फर्म होणार कि नाही असा सतत विचार येऊ लागतो. परंतु आपलं जर फिरायचं तात्काळ ठरलं तर मग प्रश्नच पडतो जायचं कस. कारण रेल्वे आरक्षणाचे तिकीट कन्फर्म मिळवणे मिळवणे एक आव्हानात्मक काम असते. मग आपण एजंटची मदत घेतो आणि तात्काळ कोटा या सर्वांचा वापर करून तिकीट कन्फर्म मिळवतो. तरी देखील जर तिकीट कन्फर्म नाही मिळाली तर व्हीआयपी कोट्याचा वापर काही जण करतात. त्याचा फायदा उचलत रेल्वेच्या मुंबईतील सीएसटीएम कॅटीनमध्ये वेटर असलेल्या व्यक्तीने गोरखधंदा सुरु केला आणि त्यातून तिकिटांचे हजारो रुपये घेऊन महिन्याकाठी दीड-दोन लाखांची कमाई केली आहे.

सासवड पोलीस ठाण्यात बेवारस दुचाकी वाहने पडून; तब्बल ‘इतक्या’ वाहनांचे होणार लिलाव

नेमका काय आहे प्रकार ?

मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्निमसवर असलेल्या रेल्वे कॅटीनमध्ये रवींद्रकुमार साहू वेटर आहे. तो वरिष्ठ अधिकाऱ्यांना चहा देण्याचे काम करत होता. त्याने वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक, मुख्य वैद्यकीय अधीक्षक आणि मुख्य अभियंता यांचे बनावट सही शिक्के तयार करुन घेतले होते. प्रवाशांची तिकिटे कन्फर्म करण्यासाठी येणारी विनंतीपत्रासाठी तो या शिक्क्यांचा वापर करत होता. त्यांची बनावट सही देखील करत होता. व्हीआयपी कोट्यातून तिकीट कन्फर्म करण्याच्या मोबदल्यात तो महिन्याला दीड ते दोन लाखांची कमाई करत होता.

त्याने व्हीआयपी कोट्यावर डल्ला मारत मोठा घोटाळा केला. प्रवाशांकडून तो तिकिटांचे हजारो रुपये घेत होता. त्याचा हा प्रकार कोलकाता मेलच्या तपासणीत लागला. कोलकाता मेलमधील प्रवाशांची तिकिटे तपासताना मध्य रेल्वेचे मुख्य दक्षता निरीक्षक जितेंद्र शर्मा आणि आर.एस. गुप्ता यांच्या पथकाला काही प्रवाशांनी आम्ही जास्त पैसे देऊन तिकीट कन्फर्म केल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांची चौकशी केली. त्यातून रवींद्र साहू याचा व्हीआयपी कोट्याचा गैरवापरचा घोटाळा उघड झाला.

प्राथमिक चौकशीत तीन महिन्यांपासून त्याने हा प्रकार केल्याचे सिद्ध झाले. परंतु प्रत्यक्षात दोन वर्षांपासून तो फसवणूक करत असल्याचा संशय आहे. त्याची यूपीआय खात्याची तपासणी केल्यावर महिन्याला लाखोंची कमाई केल्याचे उघड झाले. दक्षता निरीक्षकांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.

पुण्यात रूममेटवर प्राणघातक हल्ला; चाकूने गळ्यावर सपासप वार केले अन्…

Web Title: Waiter created a railway ticket racket earned lakhs using fake stamps and signatures of officials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2025 | 02:47 PM

Topics:  

  • crime
  • Indian Railway
  • Waiter

संबंधित बातम्या

Rajasthan Crime: BJP नेत्याच्या पत्नीचा गूढ मृत्यू! रातोरात अंत्यसंस्काराचा डाव; उघड झाले धक्कादायक कारण
1

Rajasthan Crime: BJP नेत्याच्या पत्नीचा गूढ मृत्यू! रातोरात अंत्यसंस्काराचा डाव; उघड झाले धक्कादायक कारण

फडणवीसांच्या दौऱ्यात धांदल! सरकारी ध्वज, पाट्या, बॉडीगार्ड… ‘खोटा अधिकारी’चा मोठा थाट, डीसीपींच्या शंकाळू नजरेमुळे गजाआड
2

फडणवीसांच्या दौऱ्यात धांदल! सरकारी ध्वज, पाट्या, बॉडीगार्ड… ‘खोटा अधिकारी’चा मोठा थाट, डीसीपींच्या शंकाळू नजरेमुळे गजाआड

Delhi Crime: इंस्टाग्रामवर ओळख,  ब्लॅकमेल, धमक्या आणि लैंगिक अत्याचार; कॅब ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे १६ वर्षीय मुलीची सुटका
3

Delhi Crime: इंस्टाग्रामवर ओळख, ब्लॅकमेल, धमक्या आणि लैंगिक अत्याचार; कॅब ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे १६ वर्षीय मुलीची सुटका

Nashik Crime: शारीरिक संबंध नाही तर कुटुंब मरतील…; महिलेवर अत्याचार करत केली ५० लाखांची फसवणूक, भोंदूबाबा फरार
4

Nashik Crime: शारीरिक संबंध नाही तर कुटुंब मरतील…; महिलेवर अत्याचार करत केली ५० लाखांची फसवणूक, भोंदूबाबा फरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.