crime (फोटो सौजन्य: social media)
वाशीम: वाशिममध्ये एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील एका गावातल्या २० वर्षीय तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. एका २० वर्षीय तरुणीला अहिल्यानगर येथे नेत दोन महिन्यांपासून वारंवार लैगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारी वरून जऊळका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीच नाव तनुज गौरकार असं आहे.
उल्हासनगर हादरलं! किरकोळ वादातून 30 वर्षीय युवकाची हत्या, मुख्य आरोपी अटक
नेमकं काय घडलं?
एप्रिल महिन्यात आरोपीने या तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत अहिल्यानगर जिल्ह्यातील घडवणी या गावात ठेवलं. तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवले, अखेर आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.
याप्रकरणी पोलीस निरीक्षक गणेश हिवरकर यांनी माहिती देतांना सांगितलं की, १ ऑगस्ट रोजी वाशीम येथे याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेंडीडीत तरुणीने आमच्याकडे फिर्याद दिली आरोपी तनुज गौरकार याने पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्यावरती अहिल्यानगरमधील गावामध्ये एका रूममध्ये ठेवलं, तिच्या इच्छेविरोधात वारंवार अत्याचार केले, त्यानंतर पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहे.
नाशिक हादरलं! दोन अल्पवयीनांनी आपल्याच मित्राची केली हत्या
नाशिमधील सातपूर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका खाजगी क्लासमध्ये बेंचवर बसण्यावरून वाद झाला होता या वादातून दोन अल्पवयीन मित्रांनीच मारहाण करून हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. यशराज गांगुर्डे असे मृत मुलाचे नाव आहे. तो दहावीत आहे. त्याच्याच क्लासमधील दोन अल्पवयीन मित्रांनीच मारहाण करून त्याची हत्या केल्याचे धक्कदायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.
Nashik Accident: भीषण अपघात! वयोवृद्ध महिलेला ट्रकने चिरडले, जागीच मृत्यू