उल्हासनगरमध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. किरकोळ कारणातून ३० वर्षीय युवकाची धारदार शास्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. उल्हासनगरमधील कॅम्प 1 येथील साईबाबा मंदिर परिसरात ही घटना घडली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीच नाव साजिद शेख असं आहे. याप्रकरणी दोन आरोपीना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपी फरार आहेत. याप्रकरणी पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
वडगाव मावळमधील तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, गळफास घेऊन संपवलं जीवन; कारण…
नेमकं काय घडलं?
१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साजिद शेख आणि रोहित पासी यांची भेट झाली होतो. त्यांच्यात झालेल्या वादावर चर्चा करण्यासाठी हे दोघे पुन्हा एकत्र आले होते. मात्र, चर्चा शांतपणे न सुटत वाद वाढला. त्या रात्री सुमारे अडीच वाजता साजिदच्या मित्राने रोहित पासी आणि त्याचा साथीदार प्रवीण उज्जीनवाल यांना अडवला. त्यानंतर साजिदला फोन करून बोलावून घेतलं. साजिद मदतीसाठी घटनास्थळी पोहोचताच,आधीपासूनच दबा धरून बसलेल्या 15 ते 20 जणांच्या टोळक्याने त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. साजिद गंभीर जखमी झाला होता त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता. ही थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
उल्हासनगर पोलिसांनी आरोपी रोहित पासी आणि त्याचा साथीदार प्रवीण उज्जीनवाल याला अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध पोलीस करत आहे. साजिदची पत्नी गरोदर आहे. जो पर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तो पर्यंत मी साजिदचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा तीव्र आक्रोश तिने व्यक्त केला आहे. पोलिसांनी मुख्य दोन आरोपींना अटक केली आहे आणि उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे.
Karjat Crime News : कर्जतमध्ये वाढतेय गुन्हेगारी प्रवृत्ती ? स्थानिक पत्रकारावर जीवघेणा हल्ला
कर्जत तालुक्यातील युवा पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याने संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. हा हल्ला केवळ एका पत्रकारावर नसून तो लोकशाही व्यवस्थेवरच केलेला हल्ला असल्याची तीव्र भावना तालुक्यातील सर्व पत्रकारांनी व्यक्त केली आहे.
वेळीच सावध व्हा! १ वर्षात भारताला सायबर गुन्हेगारांकडून २२,८४२ कोटी रुपयांचे नुकसान