
crime (फोटो सौजन्य: social media)
सलूनच्या नावाखाली लपूनछपून सुरु होता वेश्याव्यवसाय; पोलिसांनी धाड टाकली अन् भांडाफोड झाला
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सवासनी गावातील जगताप दाम्पत्यामध्ये काही कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर मानसिक तणावाखाली पत्नी सीमा अमोल जगताप हिने गावाजवळील विहिरीत उडी घेतली. सीमाने उडी घेतल्याचे लक्षात येताच तिचे पती अमोल जगताप यांनी कोणताही विचार न करता तिला वाचवण्यासाठी तत्काळ विहिरीत उडी मारली. मात्र दुर्दैवाने दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे मदतीचा हा प्रयत्न निष्फळ ठरला आणि दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
मध्यरात्री सापडलेल्या चप्पलांनी उलगडा
जगताप दाम्पत्य रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत, त्यामुळे कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोध सुरू असताना गावाजवळील विहिरीशेजारी चपला पडल्याचे दिसले. यामुळे गावकऱ्यांच्या मनात संशय निर्माण झाला. तात्काळ मंगरूळपीर पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन दलाची धाव
घटनेची माहिती मिळताच पोलिस जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन आपात्कालीन शोध व बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. बचाव पथकाने तत्काळ सर्च ऑपरेशन सुरू केले. काही वेळातच सीमाचा आणि अमोलचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. दोन्ही मृतदेहांना शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.
परिसरात शोककळा
जगताप दाम्पत्याचा अकस्मात आणि दुर्दैवी मृत्यू गावकऱ्यांसाठी मोठा धक्का ठरला आहे. साध्या घरगुती वादातून मोठे संकट ओढवले आणि दोघांचेही जीव गेले. या संपूर्ण घटनेचा तपास मंगरूळपीर पोलिस करीत असून परिसरात हळहळ आणि शोककळा पसरली आहे.
Ans: वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील सवासनी गावात ही घटना घडली.
Ans: पत्नीने विहिरीत उडी घेतल्यानंतर पती तिला वाचवण्यासाठी उडी मारली, पण दोघांनाही पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला
Ans: पोलिसांनी बचाव पथकाला बोलावून दोन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढले आणि पुढील तपास सुरू केला आहे.