Photo Credit- Social Media कोरटकरला परदेशात पळून जाण्यात मदत कुणी केली? इंद्रजीत सावंतांचा संतप्त सवाल
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा अपमान करणारा दुबईला पळून जातो, हे राज्याच्या गृहखात्याचं अपयश आहे. प्रशांत कोरटकरने अशी वक्तव्ये करून एक महिना उलटून गेला तरी त्याला पकडण्यात आले नाही. आता तो दुबईला पळून गेल्याची चर्चा सुरू आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्या चिल्लर माणसाला मदत करणाऱ्यांचा बुरखा खेचून काडला पाहिजे, अशा शब्दांत इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी निशाणा साधला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणार आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत याना धमक्या देणार प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरून इंद्रजीत सावंत यांनी राज्य सरकार आणि गहखात्याच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत.मी कोल्हापूरमध्ये राहतो, माझा आणि त्या कोरटकरचा आयुष्यात कधीच संबंध आला नाही. मग माझा फोन नंबर त्याला कोणी दिला ? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला आहे.
Prashant Koratkar update: प्रशांत कोरटकर दुबईला फरार? पोलिसांवरच संशयाची सुई
यावेळी बोलताना इंद्रजीत सावंत म्हणाले की, प्रशांत कोरटकर अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही, यामुळे संशयाची साखळी अधिकच वाढत आहे. त्याचा पासपोर्ट ताब्यात घ्यावा, जेणेकरून तो देशाबाहेर पलायन करू शकणार नाही. इतक्या दिवसांपासून शोधमोहीम सुरू असूनही त्याचा थांगपत्ता न लागल्याने, कोणीतरी त्याला पाठीशी घालत आहे का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, इंद्रजीत सावंत यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत, कोरटकरला कोणत्या ना कोणत्या यंत्रणेचे संरक्षण मिळत आहे, अशी स्पष्ट शंका व्यक्त केली आहे.
“कोणीतरी जाणीवपूर्वक प्रशांत कोरटकरला वाचवत आहे, म्हणूनच त्याला आत्तापर्यंत अटक होत नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. पोलिसांनी संपूर्ण प्रकरण अधिक गांभीर्याने घेतले पाहिजे आणि त्याच्या अटकेसाठी प्रभावी पावले उचलली पाहिजेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्ती शोधून काढल्या पाहिजेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली.
प्रशांत कोरटकरला वाचवणाऱ्या शक्तींना उघड करण्याची गरज आहे. जर कोरटकरला कोणी पाठीशी घालत असेल, तर त्यांचा बुरखा फाडला पाहिजे. हे फक्त पोलिसांचे नाही, तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांचेही काम आहे,” असेही सावंत यांनी म्हटले आहे. तसेच. प्रशांत कोरटकर परदेशात पळून जाऊ नये, म्हणून त्याचा पासपोर्ट ताब्यात घेण्याची मागणी सावंत यांनी केली. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी अधिक ठामपणे मांडली आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणावर आता सरकार काय भूमिका घेते आणि कोरटकरला मदत करणाऱ्यांवर कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. जर तो देशाबाहेर गेला असेल, तर त्याला परत आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातील, याबाबत लवकरच मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.