crime (फोटो सौजन्य: social media )
चंद्रपुर: महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. नदी,नाले, तळे तळ्यांना पूर आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला जात आहे.त्यात आता चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. नदीपात्रात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील टेकरी येथे ही घटना घडली आहे.
टेकरी येथील दहावीत शिकणारे १३ जण फुटबॉल मॅच झाल्यावर उमा नदीत पोहायला गेले होते. मात्र नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने यातील दोन जण नदीत बुडाल्याची घटना समोर आली आहे. मृतकाचे नाव आयुष गोपाले (१६) आणि जीत वाकळे (१७) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. दोन्ही अल्पवयीन सिंदेवाही शहरातील रहिवासी असून घटनेची माहिती प्राप्त होताच सिंदेवाही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतकांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.या दुर्घटनेने वाकडे आणि गोपाले कुटुंबासह गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोक व्यक्त केला जात आहे, घटनेचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती परिस्थिती निर्माण झाली आहे. यवतमाळ मध्ये मुसळधार पावसामुळे १७ गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देत नागरिकांना आवाहन केलं जातय.
पुण्यातील लोहगाव भागात टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला; तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार
पुण्यात गन्हेगारी वाढली असून, गुन्हेगारांच्या टोळ्या सतत धुडगूस घालत असल्याचे दिसून येत आहे. खून, मारामाऱ्या, दरोडे यासारख्या घटनांनी पुणेकर नागरिकांमधिये भिती पसरत आहे. अशातच आता पुण्यातील लोहगाव भागातून एक घटना समोर आली आहे लोहगाव भागात वैमनस्यातून टोळक्याने एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
भाऊसाहेब गोपीनाथ राखपसरे (वय ४८, रा. मोझे आळी, लोहगाव) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खुनाचा प्र्रयत्न केल्याप्रकरणी नितीन सकट, निकेश पाटील, गणेश सखाराम राखपसरे, ओंकार उर्फ खंड्या खांडे यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.