Crime
बंगळुरू : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच राजधानी दिल्लीतील श्रद्धा वालकर खून प्रकरणासारखेच एक प्रकरण बंगळुरूमध्ये घडल्याचे समोर आले आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्या महालक्ष्मी या 29 वर्षीय महिलेच्या मृतदेहाचे 30 पेक्षा जास्त तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण उघड झाले आहे.
हेदेखील वाचा : अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी किशोरी पेडणेकर पोलीस स्टेशनला दाखल
महालक्ष्मी दुसऱ्या राज्यातील रहिवासी होती. तिची माहिती जाणून घेतली जात आहे. ती पतीपासून विभक्त झाल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या 3 महिन्यांपासून येथे ती भाड्याने राहत होती. बंगळुरूमध्ये एका मॉलमध्ये ती काम करायची. तिचा नवरा शहरापासून दूर एका आश्रमात काम करतो. घटनेची माहिती मिळताच तोही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओळखीच्या व्यक्तीने महिलेची हत्या केल्याचा संशय आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
बंगळुरू पश्चिमचे अतिरिक्त पोलीस आयुक्त एन. सतीश कुमार म्हणाले, ‘ही घटना व्यालीकेवल पोलीस स्टेशन परिसरातील मल्लेश्वरम भागात घडली. हा खून 4-5 दिवसांपूर्वीच झाल्याचे दिसत आहे. श्वानपथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीमही दाखल झाली. आता याप्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.
18 मे 2022 मध्ये श्रद्धाची हत्या
18 मे 2022 मध्ये दिल्लीतील छतरपूर भागात राहणाऱ्या आफताबने त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची गळा आवळून हत्या केली. यानंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून 300 लिटरच्या फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते. आफताब हे तुकडे हळू हळू फेकून देत असे. रोज एक-दोन तुकडे तो जंगलात टाकायचा. 12 नोव्हेंबर 2022 रोजी दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली. सध्या तो अटकेत आहे.
हेदेखील वाचा : वनराज आंदेकर खून प्रकरणात मोठी अपडेट; कोमकर-गायकवाडमधील महत्वाची दुवा सापडला