अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी किशोरी पेडणेकर पोलीस स्टेशनला दाखल
अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी जाब विचारण्यासाठी माजी महापौर किशोरी पेडणेकर नागपुर मधील पारडी पोलीस स्थानकात दाखल आहेत. दरम्यान 15 सप्टेंबर रोजी नागपुरातील पारडी परिसरातील एका घरात घुसून 9 वर्षाच्या नाबालिक बलिकेवर अत्याचार करण्यात आला होता. तब्बल पाच दिवसांनी काल रात्री उशीरा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याचपार्श्वभूमीवर आज (२१ सप्टेंबर) सकाळी मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर या नागपुर शहरातील पारडी पोलीस स्थानकात दाखल झाल्या आहेत. यासंदर्भात पोलिसांना अनेक प्रश्न त्यांनी विचारले. याचदरम्यान नागपूर स्मार्ट सीटी नावालाच असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. सीसीटीव्ही असताना देखील आरोपी पकडायला 5 दिवस लागले माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
सविस्तर बातमी लवकरच….