Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! अपघातानंतर तिघांना मारहाण करून महिलेची काढली छेड; कर्जत तालुक्यातील प्रकार

बिरदोले गावात रात्री साडे नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास गावातील तरुण निखिल परशुराम कालेकर याचा अपघात झाल्याने त्याचे काका सतीश कालेकर हे रुग्णालयात घेऊन गेले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 02, 2025 | 01:34 PM
धक्कादायक ! अपघातानंतर तिघांना मारहाण करून महिलेची काढली छेड; कर्जत तालुक्यातील प्रकार

धक्कादायक ! अपघातानंतर तिघांना मारहाण करून महिलेची काढली छेड; कर्जत तालुक्यातील प्रकार

Follow Us
Follow Us:

कर्जत : कर्जत तालुक्यातील बिरदोले गावात बुधवारी रात्री अपघातग्रस्त जखमी तरुणाच्या चौकशीवरून वाद निर्माण झाला. त्या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले आणि त्यात तेथे भांडण सोडण्यासाठी आलेल्या महिलेची छेड काढण्यात आल्याची घटना घडली. याबाबत नेरळ पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बिरदोले गावात रात्री साडे नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास गावातील तरुण निखिल परशुराम कालेकर याचा अपघात झाल्याने त्याचे काका सतीश कालेकर हे रुग्णालयात घेऊन गेले होते. अपघात घडला त्यावेळी कालेकर आणि मानिवली गावातील तरुण यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यानंतर मानीवली, बिरदोले आणि देवपाडा येथील सात तरुण हे निखिल परशुराम कालेकर याच्या घरासमोर जमले. त्यावेळी अंजना परशुराम कालेकर या त्यांच्या अंगणात उभ्या होत्या. त्यावेळी ते सात तरुण आले आणि त्यांनी अंजना कालेकर तसेच साक्षीदार यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

आवाज ऐकून परशुराम वाळकु कालेकर, प्रेम परशुराम कालेकर आणि अंजना परशुराम कालेकर हे एकत्र आल्यावर त्यांना तेथील प्लास्टिक खुर्ची तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली.

तिघांना केली अटक

या माराहाणीत ते तिघे जखमी झाले असून, देवपाडा गावातील एका तरुणाने महिलेसोबत अश्लील वर्तन करून मनास लज्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी ‘सतीश कुठे भेटेल तेथे मुडदा पाडू’, अशी धमकी दिल्याची तक्रार नेरळ पोलिस ठाणे येथे दाखल झाली. याबाबत नेरळ पोलिसांनी फिर्यादी यांच्या सांगण्यानुसार, तत्काळ गुन्हा दाखल केला. मानिवली येथील तीन, देवपाडा आणि बिरदोले तसेच अन्य अनोळखी तीन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन आरोपींना नेरळ पोलिसांनी अटक केली आहे.

राज्यात वाढतंय गुन्हेगारीचे प्रमाण

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना नुकतीच समोर आली होती. प्रेमसंबंघाच्या संशयातून तरुणाला दांडक्याने बेदम मारहाण करून त्याच्या खूनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. हा प्रकार सुखसागरनगर परिसरात घडला असून, याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

Web Title: Woman molested by beating three people after accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2025 | 01:34 PM

Topics:  

  • Accident News
  • Karjat
  • Molestation Case

संबंधित बातम्या

गणरायाच्या मिरवणुकीत ‘मृत्यूचा ट्रेलर’ ! आधी ट्रॅक्टरला धडक, नंतर दुचाकीस्वाराला चिरडले; चालकासह दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
1

गणरायाच्या मिरवणुकीत ‘मृत्यूचा ट्रेलर’ ! आधी ट्रॅक्टरला धडक, नंतर दुचाकीस्वाराला चिरडले; चालकासह दोघांचा मृत्यू, सात जण जखमी

वरई उड्डाणपुलावर मोठी दुर्घटना; ट्रकचा टायर निखळून PSI गंभीर जखमी
2

वरई उड्डाणपुलावर मोठी दुर्घटना; ट्रकचा टायर निखळून PSI गंभीर जखमी

जांभुळवाडीतील दरी पुलावर ट्रकचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू; जखमींचाही आकडा समोर
3

जांभुळवाडीतील दरी पुलावर ट्रकचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू; जखमींचाही आकडा समोर

Accident News : पाटस-दौंड रोडवर दोन दुचाकींचा भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
4

Accident News : पाटस-दौंड रोडवर दोन दुचाकींचा भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.