Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाचेची रक्कम घेऊन महिला पोलिसाने ठोकली धूम; एसीबीने पाठलाग करून पकडलं

तक्रारदार व्यक्तीचा डेअरी व दुध विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रारदाराने 31 मार्च रोजी रात्री अकराच्या सुमारास डेअरीमधील दूध विक्री उशिरापर्यंत सुरू ठेवल्यामुळे कारवाई करण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 06, 2025 | 11:12 AM
लाचेची रक्कम घेऊन महिला पोलिसाने ठोकली धूम; पण एसीबीने पाठलाग करून पकडून आणलं

लाचेची रक्कम घेऊन महिला पोलिसाने ठोकली धूम; पण एसीबीने पाठलाग करून पकडून आणलं

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : न्यायालयात खटला दाखल न करण्यासाठी तसेच दंड न भरण्यासाठी पोलिस कर्मचारी महिलेने भोसरी पोलिस ठाण्याच्या परिसरात एक हजाराची लाच स्वीकारली. त्यानंतर संशय आल्याने महिलेने दुचाकीवरून पळ काढला. मात्र, पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पाठलाग करून महिलेला पिंपरी न्यायालयाजवळ पकडले. ही कारवाई शनिवारी (दि.5) करण्यात आली.

रेशमा बाळू नाईकरे (वय 32) असे कारवाई झालेल्या पोलिस कर्मचारी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी दूध विक्रीचा व्यवसाय असलेल्या 35 वर्षीय डेअरी चालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक अमोल भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्तीचा डेअरी व दुध विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रारदाराने 31 मार्च रोजी रात्री अकराच्या सुमारास डेअरीमधील दूध विक्री उशिरापर्यंत सुरू ठेवल्यामुळे कारवाई करण्यात आली. यात तक्रारदार यांना भोसरी पोलिस ठाणे येथे आणून त्यांच्याविरुद्ध खटला भरला होता.

तक्रारदार यांच्या विरुद्धचा खटला न्यायालयात न पाठवता व कोणताही दंड न भरण्यासाठी पोलिस कर्मचारी रेश्मा नाईकरे यांनी दोन हजार रुपयांची लाच मागितली. त्याबाबत तक्रारदार यांनी शुक्रवारी (दि.4) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने शनिवारी (दि.5) लाच मागणीबाबत पडताळणी करण्यात आली. रेश्मा नाईकरे यांनी तक्रारदाराविरुद्ध मुंबई पोलिस अधिनियमानुसार कारवाई न करण्याकरता सुरुवातीस दोन हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती एक हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

एसीबीने सापळा रचला अन्…

पडताळणीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. त्यावेळी रेश्मा नाईकरे यांनी भोसरी पोलिस ठाण्याच्या परिसरामध्ये तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर संशय आल्याने रेश्मा नाईकरे तेथून दुचाकीवरून पळून जात होत्या. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पाठलाग करून रेश्मा नाईकरे यांना पिंपरी न्यायालयाच्या बाहेरील रस्त्यावर पकडले. लाच स्वरुपात स्वीकारलेली रक्कम व मोबाईल फोन जप्त करण्यात आला. रेशमा नाईकरे यांच्यावर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

लाचलुचपत विभागाची कारवाई

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, पुणे विभागाचे अपर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे/खराडे, विजय चौधरी, उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक अमोल भोसले, पोलिस अंमलदार कोमल शेटे, अश्विन कुमकर, दीपक काकडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Woman police caught by acb due to bribe case nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2025 | 11:10 AM

Topics:  

  • Bribe Case
  • crime news

संबंधित बातम्या

Crime News: रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई! दरोड्याचा कट उधळला; पळून आलेल्या मुलाची सुटका
1

Crime News: रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई! दरोड्याचा कट उधळला; पळून आलेल्या मुलाची सुटका

टायर फुटून बसला लागली आग; हॉटेलसमोर थांबलेली बस जळून खाक
2

टायर फुटून बसला लागली आग; हॉटेलसमोर थांबलेली बस जळून खाक

धक्कादायक ! लष्करप्रमुखांच्याच नावाने डीपफेक व्हिडिओ; खळबळजनक विधानंही केली
3

धक्कादायक ! लष्करप्रमुखांच्याच नावाने डीपफेक व्हिडिओ; खळबळजनक विधानंही केली

गुंतवणुकीतून ज्यादा पैशांचे आमिष दाखवले अन् तरुणाला लुटले; व्हॉट्सअ‍ॅपवर ‘तो’ मेसेज आला अन्…
4

गुंतवणुकीतून ज्यादा पैशांचे आमिष दाखवले अन् तरुणाला लुटले; व्हॉट्सअ‍ॅपवर ‘तो’ मेसेज आला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.