Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई! दरोड्याचा कट उधळला; पळून आलेल्या मुलाची सुटका

छत्रपती संभाजीनगर रेल्वे पोलीस आणि आरपीएफने दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अटक केली. तसेच ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत एका मुलाची सुटका केली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 12, 2026 | 03:53 PM
रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई!

रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई!

Follow Us
Follow Us:

 

  • रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई!
  • दरोड्याचा कट उधळला
  • पळून आलेल्या मुलाची सुटका
रेल्वे प्रवाशांवर दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना ताब्यात घेण्याबरोबरच घरातून पळून गेलेल्या एका मुलाला त्याच्या कुटुंबीयांकडे सुरक्षित पोहोच करण्याची कामगिरी रेल्वे सुरक्षा बल तसेच सरकारी रेल्वे पोलिसांनी केली आहे. यासोबतच इतर प्रकरणातही रेल्वेला यश आले आहे.

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) ने ऑपरेशन यात्री सुरक्षा, ऑपरेशन रेल सुरक्षा आणि ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत ७ मार्च रोजी गाडी क्रमांक १७६३० नांदेड-हडपसर एक्सप्रेसमध्ये छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर घडलेल्या चैन स्नॅचिंगच्या घटनेचा आरपीएफ, जीआरपी आणि सीआयबी पथकाने संयुक्त कारवाई करून यशस्वी उलगडा केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला प्लॅटफॉर्म क्रमांक ४ जवळ अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीस गेलेली अंदाजे ४३ हजार ७०० किमतीची सुमारे १७.५७ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी जप्त करण्यात आली असून पुढील तपासासाठी ती सरकारी रेल्वे पोलिस यांच्या ताब्यात देण्यात आली आहे.

८ मार्च रोजी पिंगळी रेल्वे स्थानकाजवळ आरपीएफ व जीआरपीच्या संयुक्त पथकाने रेल्वे प्रवाशांना लक्ष्य करून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान चार मोबाईल फोन, दोन दुचाकी आणि तीन धारदार लोखंडी शखे जप्त करण्यात आली. आरोपीच्या ताब्यात तब्बल १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना जीआरपी नांदेड यांच्या ताब्यात देण्यात आले.

Madhya Pradesh Crime: संतापजनक! आठवीत शिकणारी विद्यार्थिनी गर्भवती, तब्बल सहा महिने सुरु होता अत्याचार

८ मार्च रोजी परभणी रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर प्रवाशांचे सामान चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका संशयित व्यक्तीला आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. आरोपीला जीआरपी परभणी यांच्या ताब्यात दिले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ऑपरेशन रेल सुरक्षा अंतर्गत ७ मार्च रोजी अकोला रेल्वे स्थानकावर आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे रेल्वे सिग्नलिंग केबल चोरीची घटना टळली. प्लॅटफॉर्म क्रमांक ६ जवळ सिग्नलिंग केबल कापत असताना दोन व्यक्तींना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून सुमारे १० मीटर सिग्नलिंग केबल तसेच गुन्ह्यात वापरलेली साधने जप्त करण्यात आली. आरोपींना रेल्वे संपत्ती अधिनियम अंतर्गत अटक केली.

‘नन्हें फरिश्ते’ अंतर्गत मुलाची सुटका

ऑपरेशन नन्हें फरिश्ते अंतर्गत ८ मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर आरपीएफ व जीआरपी कर्मचाऱ्याऱ्यांनी घरातून पळून जाऊन रेल्वेत चढलेल्या १७ वर्षीय मुलाची सुटका केली. समुपदेशनानंतर संबंधित अल्पवयीन मुलाला रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन सुरक्षितपणे करण्यात आले.

उंब्रज परिसरात तब्बल 25 लाखांचा लाकूड साठा जप्त; सातारा वनविभागाचे चार ठिकाणी छापे

Web Title: Chhatrapati sambhajinagar railway police rpf robbery prevention operation nanhe farishte

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 03:53 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news
  • police
  • RPF

संबंधित बातम्या

मालमत्तेच्या वादातून भररस्त्यात मुलानेच केली बापाची हत्या; चाकूने सपासप वार केले अन् नंतर…
1

मालमत्तेच्या वादातून भररस्त्यात मुलानेच केली बापाची हत्या; चाकूने सपासप वार केले अन् नंतर…

धाराशिव तालुक्यातील खून प्रकरणातील आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेने कर्नाटकत केली कारवाई
2

धाराशिव तालुक्यातील खून प्रकरणातील आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेने कर्नाटकत केली कारवाई

बांधकाम व्यावसायिकाच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट; आरोपींबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय
3

बांधकाम व्यावसायिकाच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट; आरोपींबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय

बांग्लादेशी क्रिकेटपटूवर पोलिसांचा ‘अत्याचार’; Nayeem Hasan ला बेदम मारहाण; दोषींवर थेट…
4

बांग्लादेशी क्रिकेटपटूवर पोलिसांचा ‘अत्याचार’; Nayeem Hasan ला बेदम मारहाण; दोषींवर थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.