Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! लष्करप्रमुखांच्याच नावाने डीपफेक व्हिडिओ; खळबळजनक विधानंही केली

काही पाकिस्तानी प्रोपागंडा अकाउंट्सने भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या आदेशावरून भारतीय नौदलाने इराणी जहाजावर हल्ला केला. तसेच नौदलप्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी राजीनामा देणार असल्याचा खोटा दावा केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 11, 2026 | 01:12 PM
धक्कादायक ! लष्करप्रमुखांच्याच नावाने डीपफेक व्हिडिओ; PIB कडून केला गेला पर्दाफाश

धक्कादायक ! लष्करप्रमुखांच्याच नावाने डीपफेक व्हिडिओ; PIB कडून केला गेला पर्दाफाश

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : सध्या सोशल मीडियावर भारतीय लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा कथित व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. मात्र, तो डीपफेक आणि डिजिटलरित्या छेडछाड केलेला असल्याचे अधिकृत तपासात स्पष्ट झाले आहे. सुरक्षा यंत्रणांनी हा व्हिडिओ पाकिस्तान समर्थित प्रोपागंडा अकाउंट्सद्वारे पसरवला जात असल्याचा इशारा दिला आहे.

सध्या लष्करप्रमुखांच्याच नावाने व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये जनरल द्विवेदी हे आंतरराष्ट्रीय जलसीमेतील एका इराणी जहाजाची अचूक लोकेशन भारताने इस्रायलला दिली, कारण भारत हा इस्रायलचा रणनीतिक सहकारी आहे, असे म्हटले आहे. मात्र, तपासात हा दावा पूर्णपणे खोटा आणि बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पीआयबीच्या ‘पीआयबी फॅक्ट चेक विभागा’नेही या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. काही पाकिस्तानी प्रोपागंडा अकाउंट्सने भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या आदेशावरून भारतीय नौदलाने इराणी जहाजावर हल्ला केल्याचा तसेच नौदलप्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी राजीनामा देणार असल्याचा खोटा दावा केल्याचेही पीआयबीने स्पष्ट केले आहे. या सर्व दाव्यांना कोणताही अधिकृत आधार नसल्याचेही पीआयबीने नमूद केले आहे.

नागरिकांनी अधिकृत सरकारी स्रोतांवरच विश्वास ठेवावा

अधिकाऱ्यांनी नागरिकांना सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ किंवा संदेश सत्यता पडताळणी न करता शेअर करू नयेत, असे आवाहन केले आहे. शत्रू देशांकडून ‘माहिती युद्धा’च्या माध्यमातून देशात भ्रम आणि अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याने नागरिकांनी सावध राहून केवळ अधिकृत सरकारी स्रोतांवरच विश्वास ठेवावा, असेही त्यांनी सांगितले आहे.

विधानांचा केला आभास

सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, हा व्हिडिओ आधुनिक डीपफेक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाद्वारे एखाद्या व्यक्तीचा चेहरा आणि आवाज डिजिटल पद्धतीने बदलून त्यांच्याकडून कधीही न केलेली विधाने केल्याचा आभास निर्माण केला जातो. भारत, इराण आणि इस्रायल यांच्यातील सध्याच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे बनावट व्हिडिओ पसरवून गोंधळ आणि तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

हे देखील वाचा :  ISI Spy Arrested: ७ वर्षांची सेवा आणि देशाशी गद्दारी! नौदलाचा सैनिकच निघाला ISIचा गुप्तहेर निघाला

Web Title: Deepfake video in the name of the army chief upendra dwivedi exposed by pib

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • crime news
  • pune news

संबंधित बातम्या

पुण्यात तापमानाचा पारा 35 अंशांवर; उन्हाचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता
1

पुण्यात तापमानाचा पारा 35 अंशांवर; उन्हाचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता

गुंतवणुकीतून ज्यादा पैशांचे आमिष दाखवले अन् तरुणाला लुटले; व्हॉट्सअ‍ॅपवर ‘तो’ मेसेज आला अन्…
2

गुंतवणुकीतून ज्यादा पैशांचे आमिष दाखवले अन् तरुणाला लुटले; व्हॉट्सअ‍ॅपवर ‘तो’ मेसेज आला अन्…

Iran Israel युद्धामुळे विद्यार्थी, नोकरदार उपाशी राहणार? गॅस तुटवड्यामुळे हॉटेल, मेस अन्….; नुकसान किती?
3

Iran Israel युद्धामुळे विद्यार्थी, नोकरदार उपाशी राहणार? गॅस तुटवड्यामुळे हॉटेल, मेस अन्….; नुकसान किती?

Crime News: मुंबई विमानतळावर कस्टम्सची धडक कारवाई! १२ कोटींचे ड्रग्ज आणि लाखांचे सोने जप्त; ५ प्रवाशांना बेड्या
4

Crime News: मुंबई विमानतळावर कस्टम्सची धडक कारवाई! १२ कोटींचे ड्रग्ज आणि लाखांचे सोने जप्त; ५ प्रवाशांना बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.