crime (फोटो सौजन्य: social media )
पुण्यातील दौंड तालुक्यातील देऊळगाव येथे एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आला आहे. पोलीस असल्याची बतावणी करत आरोपीने एका महिलेवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर गावात एकाच खळबळ उडाली आहे.
कोयत्याचे 336 हल्ले, 10 गोळीबार; पुण्यात गुन्हेगारांचा थरकाप उडवणारा धुमाकूळ
नेमकं काय घडलं?
दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथे एकाने आपण पोलीस असल्याचे बतावणी केली. त्यानंतर एका महिलेवर बलात्कार केला आहे. आरोपीने या पीडित महिलेस आपण पोलीस आहे. तुझे घर तपासायचे आहे असं सांगत घराची तपासणी केली. त्यानंतर शेजारी असलेलय घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. महिलेने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना हा सगळा प्रकार महिलेने सांगितला.
पोलिसच आरोपी असल्याने तपासाची चक्र वेगाने फिरली. या प्रकरणी संतोष हडागळे या आरोपीला अटक करण्यात आले. तो पोलीस नव्हता हे ही स्पष्ट झालं. त्याने पोलीस असल्याचे खोटे सांगितले होते. याच्यावर अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दौंडचे पोलीस अधिकारी बापूराव दडस हे करीत आहेत. त्याने हा प्रकार कोणत्या हेतूने केला याचा तपास पोलिस करत आहेत.
मुंबईच्या नालासोपाऱ्यात शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन, अकॅडमीमध्ये जाऊन शिक्षकाला दिला चोप
मुंबईच्या नालासोपाऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. IITN अकॅडमीच्या शिक्षकाकडून एका १६ वर्षाच्या विध्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचा समोर आलं आहे. याबाबतची माहिती पालकांना मिळताच त्यांनी अकादमीमध्ये जाऊन शिक्षकाला बेदम चोप दिला आहे. त्यानंतर पालकांनी शिक्षकाला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
शिक्षकाचे गैरवर्तन पीडित विद्यार्थिनीने आपल्या पालकांना सांगितल्यानंतर आज पालकांनी अकॅडमीमध्ये जाऊन त्या शिक्षकाला बेदम चोप दिला आहे. पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 74, बालकांचे लैंगिक अपराधा पासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.अटक केलेल्या शिक्षकाचे नाव राहुल दुबे असे आहे. तो नालासोपारा पश्चिम आयआयटीएन अकॅडमीमध्ये शिक्षक आहे.