पुणे: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात एका गर्भवती महिलेचा उपचार न् मिळाल्याच्या कारणामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. राज्य सरकारने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मंगेशकर रूग्णालाय हे धर्मादाय रूग्णालय आहे. मात्र अनेक रूग्णालय धर्मादाय असल्याचा फायदा घेतात मात्र रूग्णांना त्याचा फायदा होत नाही. याबाबत आता राज्य महिला आयोगाने महत्वाचे निर्देश दिले आहेत.
मंगेशकर रूग्णालयात मृत्यू झालेल्या महिलेस वेळेत उपचार मिळाले असते तर त्या महिलेचा जीव वाचला असता. मंगेशकर रूग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी या प्रकरणात आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंगेशकर रूग्णालय परिसरात अनेक आंदोलन केली जाता हेत. त्यामुळे पुणे पोलिसांनी रूग्णालाय परिसरात जमावबंदीचे आदेश पारित केले आहेत. तसेच धर्मादाय रूग्णालयाबाबत महिला आयोगाने महत्वाचे निर्देश दिले आहेत.
काय आहेत निर्देश?
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने धर्मादाय रुग्णालय असूनही तनिषा भिसे यांना त्यामाध्यमातून मदत न केल्याचे चौकशी अहवालात ही समोर आले आहे. या अनुषंगाने अनेक रुग्णालये धर्मादाय असूनही त्याची माहिती देत नाहीत, त्यामुळे सामान्य नागरिकांना मदत मिळत नाही हे निदर्शनास आले आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकालाही चांगले उपचार मिळावे यासाठी असलेला धर्मादाय रुग्णालयाचा हेतूच साध्य होत नाही.
तेव्हा सर्व धर्मादाय रुग्णालयांनी यापुढे ‘धर्मादाय’ असा उल्लेख असलेला फलक दर्शनी भागात लावावा, त्यानुसार असलेल्या सुविधा, नियमावली यांची माहितीही लावावी यासाठी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश राज्य महिला आयोगाने आयुक्त, धर्मादाय यांच्या कार्यालयाला दिले होते. धर्मादाय सहआयुक्त यांच्या विधी व न्याय विभागाने असे फलक लावण्यात आले असल्याचे आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही रुग्णालयाकडून फलकप्रसिद्धी करणेबाबत पूर्तता राहिली असल्यास त्याबाबत कारवाई करून त्रुटी दूर करणेसाठी निर्देशित केले असल्याचे कळवले आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने धर्मादाय रुग्णालय असूनही तनिषा भिसे यांना त्यामाध्यमातून मदत न केल्याचे चौकशी अहवालात ही समोर आले आहे. या अनुषंगाने अनेक रुग्णालये धर्मादाय असूनही त्याची माहिती देत नाहीत, त्यामुळे सामान्य नागरिकांना मदत मिळत नाही हे निदर्शनास आले आहे. आर्थिक दृष्ट्या… pic.twitter.com/XOuT63TSNb
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) April 10, 2025
यापुढे सामान्य नागरिकांना असे धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी असलेल्या पण तसा उल्लेख केलेला नाही,फलक लावला नाही असे आढळल्यास तसेच नियमावली प्रमाणे मदत न मिळाल्यास ते राज्य महिला आयोगाला,शासनाला त्वरित तक्रार करू शकतात.
गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी डॉ. घैसास यांचा राजीनामा
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात एक गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंगेशकर रूग्णालय प्रशासनाच्या प्रतिमेला सुरुंग लावणाऱ्या घटनांमुळे आणि त्यामुळे रूग्णांची होणारी गैरोसी पाहता डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा स्वेच्छेने राजीनामा दिला आहे.
भाजप आमदाराच्या ‘पीए’लाच फटका, गर्भवतीचा मृत्यू
सुशांत भिसे हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहतात. त्यांची पत्नी तनिषा या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. दरम्यान अचानक रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्या तत्काळ जवळ असलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी गेल्या होत्या. परंतु, त्यांना क्रिटीकल परिस्थिती असून, डिपॉझिट म्हणून १० लाख रुपये भरा असे सांगितले. तरच पुढील प्रक्रिया सुरू करू म्हणून उपचारासाठी दाखल करून घेतले नाही. त्यांनी ३ लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली. नंतर मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून रुग्णालय प्रशासनाला संपर्क देखील करण्यात आला.