पेट्रोलचे पैसे मागताच कामगाराला पंपातच मारहाण; पेट्रोल पंप उडवून देण्याचीही दिली धमकी
अक्कलकोट : अक्कलकोट शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनेत वाढ होत आहे. अक्कलकोटची प्रतिमा मलीन होत आहे. भाविकांना मारहाणीचा प्रकार, शाईफेक करून हल्ला घटनेने महाराष्ट्रभर नव्हेतर देशपातळीवर चर्चा झाली. आता पेट्रोल पंपावरील घटनेने आणखीन चिंता वाढली आहे. दोन जणांनी पेट्रोल पंपावरील कामगारास गाडीमध्ये त्या पेट्रोलचे पैसे का मागतोस म्हणून मारहाण केली. पैसे मागितले तर पेट्रोल पंप उडवून देण्याची धमकी दिली.
आरोपींनी जबरदस्तीने कामगाराच्या खिशातील पैसे घेतले. आम्ही आल्यावर पेट्रोलचे पैसे मागायचे नाही. आल्यावर हफ्ता खंडणी द्यायची अशी धमकी दिल्याने अक्कलकोट शहरात खळबळ उडाली आहे. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शहर उत्तर पोलीस ठाण्यात दोघा युवकाविरोधात प्रदिप बाळू फुटाणे यांनी फिर्याद दाखल केली आहे. दोघांविरोधात उत्तर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या; लष्कर पोलिसांच्या पथकाची कारवाई
बुधवारी (दि.23) रात्री पावणेदहाच्या सुमारास अक्कलकोट शहरातील ए. एस. मंगरुळे नावाच्या पेट्रोलपंपावर दुचाकीवरील (एमएच 13 क्यू 9180) रियाज रहिमबक्ष बागवान व मागे बसलेला वसीम अब्दुलरज्जाक बागवान (दोघे रा. बागवानगल्ली, अक्कलकोट) यांनी 100 रुपयाचे पेट्रोल भरुन घेतलं. त्याचे पैसे न देता जात असताना फिर्यादी प्रदीप बाळू फुटाणे (वय 34) याने पैसे मागितले. त्यावेळी गाडी चालवणाऱ्याने फिर्यादीच्या गालावर चापट मारत शिवीगाळ केली. पैसे मागितले तर पेट्रालपंप उडवून देऊ अशी धमकी दिली.
याशिवाय, ‘पाठीमागे बसलेल्या इसमाने पैसे मागितले तर खल्लास करतो बघ’ अशी दमदाटी करत फिर्यादीच्या शर्टच्या वरच्या खिशातील 700 रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले . त्यावेळी फिर्यादीसोबत असलेला त्यांचे भांडणे सोडविण्यास मध्ये पडला. त्यावेळी ते दोघे फिर्यादीला उद्देशून ‘तुला पेट्रोलपंपावर काम करायचे असेल तर आम्ही येईल. तेव्हा फुकट पेट्रोल द्यावे लागेल. आम्हाला हप्ता (खंडणी) द्यावे लागेल’, असे म्हणत तुझे पेट्रोलचे पैसे व 700 रुपये देत नाही. हेच आमचा हफ्ता आहे’, असे म्हणत शिवीगाळ दमदाटी केली.
हेदेखील वाचा : ‘त्या’ निष्पाप जीवाची काय चूक? पत्नीने हुंडा दिला नाही म्हणून जन्मदाता बापाकडून आठ महिन्याच्या चिमुकल्यावर अमानुष कृत्य