Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तो’ महिलेला भेटण्यासाठी पुण्यात आला, हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्…; पुण्यातील संतापजनक प्रकार

जीवनसाथी मेट्रोमिनी साईटवरून झालेल्या ओळखीतून महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तर, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडूनच दोन लाख रुपये उकळल्याचाही प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 01, 2025 | 05:43 PM
‘तो’ महिलेला भेटण्यासाठी पुण्यात आला, हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्…; पुण्यातील संतापजनक प्रकार
Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात महिलांवरील बलात्कार, अत्याचाराच्या घटना वाढल्या आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून बलात्काराच्या घटना उघडकीस येत असतात. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जीवनसाथी मेट्रोमिनी साईटवरून झालेल्या ओळखीतून महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तर, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडूनच दोन लाख रुपये उकळल्याचाही प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित गंगाधर शेंडगे (रा. पारगाव, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत ३३ वर्षीय महिलेने खराडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला व शेंडगे या दोघांनीही जीवनसाथी मेट्रोमिनी या साईटवर नाव नोंदणी केलेली होती. त्यातून त्या दोघांची गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ओळख झाली होती. शेंडगेने महिलेला विवाहाचे आमिष दाखवून तिला जाळ्यात ओढले. नंतर तो महिलेला भेटण्यासाठी पुण्यात आला. एका हॉटेलमध्ये तो महिलेला घेऊन गेला. त्याने तिच्यावर बलात्कार केला, तसेच तिचे फोटो मोबाइलवर काढले. नंतर शेंडगेने महिलेला धमकावण्यास सुरुवात केली. हॉटेलमध्ये काढलेले फोटो महिलेचे नातेवाईक आणि गावाकडील व्यक्तींना पाठवून ते व्हायरल करण्याची धमकी दिली.

त्यासाठी पैशांची मागणी केली. त्याने वेळोवेळी महिलेकडून दोन लाख रुपये उकळले. महिलेने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने विवाहाबाबत विचारणा केल्यास विषारी ओैषध पिऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली. तसेच, सुसाईड नोटमध्ये तुझे आणि तुझ्या कुटूंबाचे नाव लिहून ठेवण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक मोनाली भदे करत आहेत.

आणखी एक संतापजनक प्रकार उघडकीस

विवाहित महिलेला घरी एकटेच पाहून तिच्या घराबाहेर जात तिच्याशी लगट करत विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. मुबारक मोळम्मद शेख (२५, रा. घोरपडेवस्त, लोणी काळभोर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका २८ वर्षीय तरूणीने तक्रार दिली आहे. (दि. २२ ऑगस्ट) दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. घटनेच्या दिवशी तक्रारदार महिला घरात एकटीच होत्या. तेव्हा मुबारक तिच्या घरी गेला. त्याने लगट साधण्याच्या हेतुन त्याने तिला मी तुला पहील्यांदा पाहिले तेव्हापासून तु मला खूप आवडत आहे, असे बोलुन लगट करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरोपीच्या सर्व प्रकाराला नकार दिल्यानंतर आरोपीने तिला तु फक्त सांग मी, तुझ्यासाठी काय करू, तुझ्या नवर्‍याला घरात घुसुन मारतो व तुला उचलुन घेऊन जातो, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी घरामध्ये शिरला आणि तिचा विनयभंग केला.

Web Title: There has been an incident of extorting money from a woman by threatening her in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 05:40 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

अडीच कोटींच्या सोन्यावर डल्ला? कलकत्त्यात दागिने बनविण्याच्या बहाण्याने 3.98 किलो सोने घेऊन सहा जण फरार
1

अडीच कोटींच्या सोन्यावर डल्ला? कलकत्त्यात दागिने बनविण्याच्या बहाण्याने 3.98 किलो सोने घेऊन सहा जण फरार

कर्जबाजारीपणामुळे पिस्तूल विक्रीचा मार्ग निवडला; सराईत गुन्हेगाराला पहिल्याच व्यवहारापूर्वी ठोकल्या बेड्या
2

कर्जबाजारीपणामुळे पिस्तूल विक्रीचा मार्ग निवडला; सराईत गुन्हेगाराला पहिल्याच व्यवहारापूर्वी ठोकल्या बेड्या

Ketan Agrawal Case: 17 कोटींचा पॅलेस आणि चार्टर्ड विमानांच्या बातम्यांवर सियाच्या वडिलांचा खुलासा; सांगितलं लग्नाचं खरं बजेट
3

Ketan Agrawal Case: 17 कोटींचा पॅलेस आणि चार्टर्ड विमानांच्या बातम्यांवर सियाच्या वडिलांचा खुलासा; सांगितलं लग्नाचं खरं बजेट

“बाबा मी जात आहे…”, सासरच्या जाचाला कंटाळून २४ वर्षीय तरुणीने संपवले आयुष्य; मृत्यूपूर्वी व्हिडिओ केला शूट
4

“बाबा मी जात आहे…”, सासरच्या जाचाला कंटाळून २४ वर्षीय तरुणीने संपवले आयुष्य; मृत्यूपूर्वी व्हिडिओ केला शूट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.