Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात Drugs विरुद्ध कठोर कारवाई; झिरो टॉलरन्स’ची भूमिका अन्…, काय म्हणाले योगेश कदम?

पोलीस आणि एमआयडीसी प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून अशा ठिकाणांवर तपास सुरू केला आहे. ग्रामीण भागातही पोलीस यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असल्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 11, 2026 | 06:57 PM
राज्यात Drugs विरुद्ध कठोर कारवाई; झिरो टॉलरन्स’ची भूमिका अन्…, काय म्हणाले योगेश कदम?
Follow Us
Follow Us:

अंमली पदार्थांविरोधात राज्यात १४ प्रकरणांत मकोका
राज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत माहिती 
राज्य शासनाने केली अँटी-नार्कीटिक टास्क फोर्सची स्थापना

मुंबई: राज्यात अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत असून आतापर्यंत १४ प्रकरणांमध्ये मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सरकारची भूमिका या प्रकरणात पूर्णपणे ‘झिरो टॉलरन्स’ची असल्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबत सदस्य शशिकांत शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य सतेज पाटील, अनिल परब, प्रविण दरेकर यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, अंमली पदार्थाच्या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने अँटी-नार्कीटिक टास्क फोर्स स्थापन केला आहे. या टास्क फोर्सचे मुख्य काम अंमली पदार्थ विरोधात कारवाई करणे आणि त्यामागील संपूर्ण साखळी शोधून काढणे असेल. अंमली पदार्थ रॅकेटमधील मुख्य आरोपींसह त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांचाही शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. अंमली पदार्थाच्या पुरवठा साखळीवरही कठोर कारवाई केली जात असून रॉ मटेरियल पुरवठा करणाऱ्यांवरही मकोका अंतर्गत कारवाई केली जात आहे.

शाळेत झाली ओळख, यूट्यूबवरून शिकून सुरू केला ड्रग्जचा धंदा; दोन शिक्षकांना पोलिसांनी केली अटक

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात उघडकीस आलेल्या अंमली पदार्थ प्रकरणात ११ आरोपींना अटक करण्यात आली असून सर्वांवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात कठोर कारवाई सुरू आहे.

काही ठिकाणी बंद पडलेल्या कारखान्यांमध्ये किंवा ग्रामीण भागातील शेडमध्ये लपूनछपून अंमली पदार्थ तयार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पोलीस आणि एमआयडीसी प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून अशा ठिकाणांवर तपास सुरू केला आहे. ग्रामीण भागातही पोलीस यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असल्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.

EL Mencho: ड्रग्ज, 8,400 कोटींची संपत्ती अन् ‘क्रूर’ साम्राज्य; माफियाच्या श्रीमंतीची ‘अशी’ गुपिते जी वाचून पायाखालची जमीनच सरकेल

यूट्यूबवरून शिकून सुरू केला ड्रग्जचा धंदा

पोलिस चौकशीदरम्यान, मनोजने उघड केले की, त्याला आग्रा येथील चांगल्या शाळेत नोकरी मिळाली नाहीं. तो एक वर्षापूर्वी जोधपूरला गेला आणि तेथे कोचिंग शिकवू लागला. त्याला एका खाजगी शाळेत नोकरी मिळाली. जून २०२५ मध्ये, तो शाळेतील शिक्षक वीरेंद्रला भेटला. त्याने त्याला आमिष दाखवले आणि ड्रग्जसाठी रसायने तथार केल्यास पैसे देण्याचे आश्वासन दिले. तो या ऑपरेशनमध्ये सामील झाला. त्याने रसायने तयार करण्यासाठी इंटरनेट आणि यूट्यूब व्हिडीओचा वापर केला, त्याने एमडीएमए औषधे तयार करण्यास आणि त्यांची विक्री करण्यास सुरुवात केली. वीरेंद्र ऑनलाइन औषधे विकायचा, त्यानंतर, तो घरून काम करू लागला, वस्तू तयार करून वीरेंद्रला पाठवू लागला. त्याने दोन महिन्यांपूर्वी एक दुकान भाडशाने घेतले.

Web Title: Yogesh kadam said mcoca invoked in 14 cases against drugs in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 06:57 PM

Topics:  

  • Drugs News
  • MCOCA Action
  • Yogesh Kadam

संबंधित बातम्या

लोणावळा ग्रामीण हद्दीत गांजाची तस्करी उघड, 8.5 किलो गांजा जप्त; तरुणाला ठोकल्या बेड्या
1

लोणावळा ग्रामीण हद्दीत गांजाची तस्करी उघड, 8.5 किलो गांजा जप्त; तरुणाला ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.